हेल्मेट घातलात तरी 2 हजारचे चालान, वाहतुकीचा 'हा' नियम माहिती आहे का?

Traffic Rules: दुचाकी वापरणारे बहुतांश लोक चांगले हेल्मेट खरेदी करण्यात कंजूषगिरी करतात. 

Pravin Dabholkar | Nov 25, 2023, 15:19 PM IST

Challan On Helmet: कोणतेही वाहन चालवताना त्यासंबंधीचे नियम आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांशी हुज्जतही होत नाही आणि आपला प्रवास विनाअडथळा पूर्ण होतो.

1/10

हेल्मेट घातलात तरी 2 हजारचे चालान, वाहतुकीचा 'हा' नियम माहिती आहे का?

Traffic Rules wear a helmet ISI Mark motorcycle challan

Challan On Helmet:गाडी चालवणाऱ्यांना वाहतूक नियम उल्लंघनाचे चालान आले की खूप मनस्ताप होतो. बऱ्याचदा असेही काही नियम असतात, जे आपल्याला माहिती नसतात आणि भुर्दंड भरावा लागतो. दुचाकी चालवताना हेल्मेट घालूनही चालान आले असा प्रकार अनेकदा घडतो. अशावेळी काय चुकलं हे कळत नाही. 

2/10

वाहतुकीचे नियम

Traffic Rules wear a helmet ISI Mark motorcycle challan

कोणतेही वाहन चालवताना त्यासंबंधीचे नियम आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांशी हुज्जतही होत नाही आणि आपला प्रवास विनाअडथळा पूर्ण होतो. 

3/10

हेल्मेट खरेदी करण्यात कंजूषगिरी

Traffic Rules wear a helmet ISI Mark motorcycle challan

अपघातावेळी हेल्मेट किती महत्वाचा असतो, हे आपल्याला कळते. तरी आपल्याकडे हेल्मेटला गांभीर्याने घेतले जात नाही. दुचाकी वापरणारे बहुतांश लोक चांगले हेल्मेट खरेदी करण्यात कंजूषगिरी करतात. 

4/10

सुरक्षेशी तडजोड

Traffic Rules wear a helmet ISI Mark motorcycle challan

ISI मार्क नसलेले स्वस्त हेल्मेट विकत घेऊन तुम्ही चालानपासून स्वतःला तर वाचवता पण तुमच्या सुरक्षेशी तडजोड करता. जो मूर्खपणाचा निर्णय आहे. चांगले आणि किफायतशीर हेल्मेट किती फायदेशीर असते, याबद्दल जाणून घेऊया. 

5/10

हेल्मेट नीट परिधान

Traffic Rules wear a helmet ISI Mark motorcycle challan

नियमांनुसार जर तुम्ही दुचाकी चालवताना हेल्मेट नीट परिधान केले असेल. पण जर हेल्मेट ISI कडून प्रमाणित नसेल तर तुम्हाला दंड आकारला जातो. 

6/10

हेल्मेट बेल्ट

Traffic Rules wear a helmet ISI Mark motorcycle challan

जर तुम्ही आयएसआय मार्क असलेले हेल्मेट घातले असेल, परंतु हेल्मेट बेल्ट घातला नसेल आणि तुम्हाला पकडले गेले तर तुम्हाला नियमानुसार दंड भरावा लागेल. 

7/10

दुप्पट दंड

Traffic Rules wear a helmet ISI Mark motorcycle challan

तसेच, जर तुम्ही ISI हेल्मेट घातले नसेल किंवा तुमची दुचाकी चालवताना हेल्मेट बेल्ट घातला नसेल तर तुम्हाला दुप्पट दंड आकारला जाईल.

8/10

ISI प्रमाणित हेल्मेट

Traffic Rules wear a helmet ISI Mark motorcycle challan

हेल्मेट नेहमी ISI प्रमाणित असावे. स्थानिक आणि आयएसआय प्रमाणित हेल्मेटच्या किमतीत फारसा फरक नसतो. आयुष्याशी तुलना केली तर नक्कीच नसतो. बरेच लोक फॅशनेबल दिसण्यासाठी अर्धे हेल्मेट देखील घालतात. तुमचा संपूर्ण चेहरा झाकता येईल, असे हेल्मेट असावे. यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास तुम्ही शक्य तितके सुरक्षित राहू शकता. त्यामुळे नेहमी चांगले हेल्मेट खरेदी करावे.

9/10

दिवस आणि रात्र दोन्ही स्पष्ट

Traffic Rules wear a helmet ISI Mark motorcycle challan

हेल्मेट खरेदी करताना हे लक्षात ठेवा की हेल्मेट जास्त सैल किंवा जास्त घट्ट नसावे. बाईक चालवताना तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सामान्य व्हिझर असलेले हेल्मेट खरेदी केले पाहिजे. जेणेकरून तुम्हाला दिवस आणि रात्र दोन्ही स्पष्ट दिसतील. सूर्यप्रकाशामुळे, बरेच लोक गडद काचेचे (रंगीत) व्हिझर विकत घेतात. ज्यामुळे रात्री गाडी चालवणे कठीण होते.

10/10

रस्त्याच्या कडेला हेल्मेट

Traffic Rules wear a helmet ISI Mark motorcycle challan

आजकाल रस्त्याच्या कडेला हेल्मेट 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळते. जे आयएसआय प्रमाणित नसते आणि सुरक्षितही नसते. 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे हेल्मेट ISI प्रमाणित असू शकत नाही. हे केवळ चलन टाळण्यासाठी असते, या हेल्मेटपासून संरक्षणाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे, असे तज्ज्ञ सांगतात.