हिजडा मेल्यावर रात्री चपलेने मारतात का? श्रीगौरी सावंत यांनी सांगितलं सत्य

तृतीयपंथींना त्यांच्या मृत्यूनंतर चपलेने मारतात, जेणेकरुन पुढच्या जन्मात पुन्हा हेच आयुष्य जगावं लागू नये असं बोललं जातं. तसंच तृतीयपंथीयांची अंतयात्रा पाहणाऱ्यांना धनलाभ होतो असंदेखील म्हटलं जातं.  

Sep 08, 2023, 12:45 PM IST

तृतीयपंथींना त्यांच्या मृत्यूनंतर चपलेने मारतात, जेणेकरुन पुढच्या जन्मात पुन्हा हेच आयुष्य जगावं लागू नये असं बोललं जातं. तसंच तृतीयपंथीयांची अंतयात्रा पाहणाऱ्यांना धनलाभ होतो असंदेखील म्हटलं जातं.

1/10

'ताली' या वेब सीरिजमुळे श्रीगौरी सावंत हे नाव चर्चेत आलं आहे. या वेब सीरिजमध्ये श्रीगौरी सावंत यांचं आयुष्य उलगडण्यात आलं आहे.   

2/10

यानित्ताने श्रीगौरी सावंत अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली असून, आपला संघर्ष उलगडला आहे. यावेळी त्यांनी तृतीयपंथीयांबद्दल असणारे काही गैरसमज दूर केले. यातील एक गैरसमज त्यांच्या मृत्यूनंतरच्या विधीसंबंधी आहे.   

3/10

तृतीयपंथींना त्यांच्या मृत्यूनंतर चपलेने मारतात, जेणेकरुन पुढच्या जन्मात पुन्हा हेच आयुष्य जगावं लागू नये असा सर्वसामान्यांचा समज आहे. याचं उत्तरही त्यांनी दिलं.   

4/10

तसंच तृतीयपंथीयांची अंतयात्रा पाहणाऱ्यांना धनलाभ होतो असंदेखील म्हटलं जातं. यावर उत्तर देताना श्रीगौरी सावंत यांनी हे गैरसमज दूर केले आहेत.   

5/10

'झी मराठी'वरील 'बस बाई बस' कार्यक्रमात श्रीगौरी सावंत यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांना तुमच्या समाजात मृत्यूनंतर काय विधी असतात? असा प्रश्न विचारण्यात आला होता.   

6/10

याचं उत्तर देताना श्रीगौरी सावंत यांनी सांगितलं की, ''अगं काही नाही ग....अगदी साध्या पद्धतीने विधी होतात. जो मुस्लिम आहे त्यांना त्यांच्या पद्धतीने आणि जे हिंदू आहेत त्यांच्यावर त्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात.   

7/10

पुढे त्यांनी सांगितलं की "आमच्या समाजात कोणीच कोणाला चपलेने मारत नाही. मलाही रिक्षावाले विचारतात की, आक्का तुमच्यात मेल्यावर पुढता जन्मही हाच मिळू नये म्हणून चपलेने मारतात का? ते पाहिल्यावर म्हणे श्रीमंत होतात. आता मी आयुष्यभर इतके मृत्यू पाहिले पण श्रीमंत झाले नाही. हे गैरसमज आहेत".   

8/10

"आपल्याकडे शत्रूला सुद्धा अशी वागणूक दिली जात नाही. त्यांनाही आपण अग्नी देतो. पण हे कोणाच्या डोक्यात आलं मला माहिती नाही की हिजडा मेल्यावर त्याला रात्री चपलेने मारतात म्हणून," अशी खंत श्रीगौरी सावंत यांनी व्यक्त केली.   

9/10

"पुढचे 10 जन्म असतील तरी मला हाच जन्म हवा. मी सुखी आहे.  माझा कोणाला काहीच त्रास नाही," असंही त्यांनी सांगितलं.   

10/10

तसंच मृत्यू झाल्यावर मृतदेह झाकून नेतात हादेखील एक गैरसमजच असल्याचं श्रीगौरी सावंत यांनी स्पष्ट केलं.