2024 मध्ये अतिशय चर्चेत आहेत मुलांची 'ही' युनिक नावे, जाणून घ्या अर्थ

Trending Baby Boy Names in Marathi : 2024 हे वर्ष अनेकांसाठी खास असेल कारण त्यांच्या घरी एका चिमुकल्याचा जन्म होणार असेल, तर काहींच्या घर दुडूदुडू पावले बागडू लागली असतील, अशा सगळ्यांसाठी 2024 या नव्या वर्षातील मुलांची युनिक नावे आणि त्याचे अर्थ. 

| Feb 28, 2024, 17:19 PM IST

Hindu Baby Boy Names And Meaning : नवीन वर्ष प्रत्येकासाठी खास असतं.. तसंच 2024 हे वर्षही खास असेन अनेक पालकांसाठी आणि नव्याने होणाऱ्या आई-बाबांसाठी.UNICEFच्या म्हणण्यानुसार, भारतात दररोज 67385 बालके जन्माला येतात, जी जगातील एकूण बाळंतपणापैकी एक षष्ठांश आहे. मार्च 2023 मध्ये, वर्ल्ड पॉ्युलेशन कॉलचे म्हणणे आहे की, भारतात प्रति मिनिट सुमारे 51 जन्म हे दररोज सुमारे 73,440 जन्मांच्या समतुल्य आहे.

1/9

ट्रेंडी नावे आणि अर्थ

Unique And Trending Baby Boy Names

अशावेळी आपल्या घरी जन्माला येणाऱ्या मुलाला हटके आणि ट्रेंडी नाव देण्याचा मानस प्रत्येक पालकांचा असतो. अशावेळी पालक मुलावर पहिला संस्कार करतात ते त्याच्या नावावरुन. हीच अनोखी ट्रेंडी नावे आपण आज पाहणार आहोत. कारण नावांमधून मुलांवर पहिला संस्कार होत असतो. त्यामुळे हा संस्कार सकारात्मक असणे अत्यंत गरजेचे आहे.   

2/9

भार्गव

Unique And Trending Baby Boy Names

मुलासाठी हे नाव निवडताना विचार मनात येईल की, हे नाव जुने आहे. पण असे असले तरीही हे अतिशय ट्रेंडी आणि कायमच युनिक ठरलेले नाव आहे. 'भार्गव' म्हणजे शिव शंकर, महादेवाच्या या नावावरुन ठेवा मुलाचे नाव.   

3/9

पार्थ

Unique And Trending Baby Boy Names

'पार्थ' नावाचा अर्थ अतिशय युनिक आहे. 'पार्थ' महाभारतातील वीर योद्धा अर्जुनाचे एक नाव आहे. तसेच पार्थचा अर्थ राजकुमार असाही आहे. त्यामुळे तुमच्या राजकुमाराला द्या हे युनिक नाव.   

4/9

जागृत

Unique And Trending Baby Boy Names

'जागृत' हे नाव अतिशय युनिक आहे. आपण 'जागृती' हे मुलीचं नाव अनेकदा ऐकलं आहे. पण मुलाचं हे युनिक नाव अतिशय वेगळं आहे. 'जागृत' नावाचा अर्थ आहे खूपच सुंदर आणि प्रेमळ. तसाच त्याचा दुसरा अर्थही होतो की जागरुकता. मुलामध्ये हा गुण जन्मतः असेल. 

5/9

छायांक

Unique And Trending Baby Boy Names

'छायांक' नावाचा संबंध थेट भगवान बुद्धाशी आहे. या नावाचा अर्थ आहे, अतिशय प्रेमळ आणि अतिशय सुंदर. हे नाव अतिशय युनिक आहे. 'छायांक' 2024 मधील अतिशय युनिक नावे. 

6/9

ऊजम

Unique And Trending Baby Boy Names

'ऊजम' नावाचा अर्थ आहे मस्त आणि स्वतःच्याच आनंदात राहणारा. हे नाव मुलासाठी अतिशय युनिक आहे. युनिक नावाचा विचार मुलासाठी करायलाच हवा.   

7/9

इभान

Unique And Trending Baby Boy Names

हे नाव गणरायाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. 'इभान' हे नाव यावर्षी जन्माला आलेल्या मुलासाठी नक्कीच निवडू शकता. अतिशय सुंदर असं हे नाव आहे. 

8/9

रुद्रांश

Unique And Trending Baby Boy Names

शिव शंकराच्या नावावारुन 'रुद्रांश' हे नाव ठेवण्यात आलंय. महादेवाशी संबंधीत हे नाव नक्कीच लक्षात घ्यायला हवं. 'रुद्रांश' नावाचा अर्थ खूप खास आहे.   

9/9

ऐदेन

Unique And Trending Baby Boy Names

'ऐदेन' हे नाव अतिशय शक्तीशाली आहे. शक्ती प्रदर्शन करणार 'ऐदेन' हे नाव खूप युनिक आणि ट्रेंडी आहे. मुलासाठी या नावाचा नक्की विचार करु शकता. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x