Titanic जहाजावरची लोकं काय खात होती? 111 वर्षांपूर्वीचं मेन्यू कार्ड झालं व्हायरल

Titanic Food Menu: टायटॅनिक जहाजाबद्दल (Titanic ship) आतापर्यंत बरीच माहिती प्रसिद्ध झाली आहे. पहिल्याच प्रवासात या जहाजाला समुद्रात जलसमाधी मिळाली. यावर एक चित्रपटही बनला होता, जो सुपरहिट ठरला. पण आता या जहाजावरची लोकं काय होती याचं एक मेन्यू कार्डच (Menu Card) सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) झालं आहे. हे मेन्यूकार्ड खरं आहे की खोटं याची सत्यता पटलेली नाही, पण लोकांमध्ये याची चांगलीच उत्सुकता आहे. 

Apr 19, 2023, 21:31 PM IST
1/6

बलाढ्य टायटॅनिक जहाज पहिल्या प्रवासाला निघालं. पण या जहाजाला समुद्रातच जलसमाधी मिळाली. जगातील हे सर्वात मोठं जहाज असल्याचं मानलं जात होतं. रात्रीच्या अंधारात एका मोठ्या हिमनगाला हे जहाज धडकलं आणि अटलांटिक महासागरात हे जहाज बुडालं.

2/6

टायटॅनिक जहाजावर त्यावेळी अनेक प्रवासी होते. यातील सर्वांनाच जलसमाधी मिळाल्याचं बोललं जातं. या घटनेवर हॉलीवूडमध्ये एक चित्रपटही बनला. जो चांगलाच सुपरहिट ठरला होता. या जहाजासंदर्भात अशा अनेक गोष्टी आहेत, त्या जाणून घेण्यात आजही लोकांमध्ये उत्सुकता आहे. 

3/6

सध्या सोशल मीडियावर टायटॅनिक जहाजासंदर्भातील आणखी एक गोष्ट व्हायरल होत आहे. टायटॅनिक जहाजावरचे प्रवासी काय खात-पीत होते. याचं तब्बल 111 वर्षांपूर्वीचं एक मेन्यू कार्ड व्हायरल झालं आहे. जहाजावर प्रवाशांसाठी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्लास असे तीन वर्ग होते. 

4/6

व्हायरल होत असलेल्या मेन्यू कार्डमध्ये सेकंड आणि थर्ड क्लास वर्गातील प्रवाशांसाठीचा मेन्यू कार्ड वेगवेगळा असल्याचं पाहिला मिळतंय. सेकंड क्लासमधल्या प्रवाशांसाठी ब्रेकफास्टमध्ये फळं, ओट्स, ताजी मच्छि, अंडी आणि फ्राईस सारखे पदार्थ मिळत होते. याशिवाय चहा आणि कॉफीदेखील दिली जात होती. 

5/6

तर थर्ड क्लास वर्गातील प्रवाशांसाठी ओट्स, दूध, ब्रेड, बटर आणि अंडि दिली जात होती. तर जेवणात भात, सूप, ब्रेड, मका, उकडलेले बटाटे, रोस्टेड बीफ सारखे पदार्थ मिळत होते. तर फर्स्ट क्लास वर्गात महागडे पदार्थ दिले जात होते. 

6/6

इन्स्टाग्रामवर  tasteatlas नावाच्या आयडीवर टायटॅनिक जहाजाचं हे मेन्यूकार्ड शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टला आतार्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. तर विविध प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत.