टीव्हीची प्रसिद्ध सून देवोलिना भट्टाचार्यचे नाव या हत्या प्रकरणात आलं होतं समोर

प्रत्येक घरात गोपी बहू या नावाने प्रसिद्ध असलेली देवोलिना भट्टाचार्जी आज आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. देवोलिना भट्टाचार्जी बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्येही गेली होती, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला शोमधून बाहेर पडावं लागलं होतं. नेहमीच ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Aug 21, 2023, 21:07 PM IST

1/7

देवोलिना भट्टाचार्जी आज आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. 

2/7

बिग बॉस या रिएल्टी शोमधून तिला खरी ओळख मिळाली. या शोमध्ये ती तिचा खेळ अतिशय विचारपूर्वक खेळायची.  

3/7

मात्र आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रीबद्दल अशी एक गोष्ट सांगणार आहोत ज्यामुळे ती कॉन्ट्रोवर्सीमध्ये आली होती.

4/7

देवोलिना ही आसामची रहिवासी आहे आणि तिने 'साथ निभाना साथिया' या टीव्ही मालिकेत 'गोपी बहू'ची भूमिका साकारली आहे. 

5/7

मुंबईतील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी तिचं नाव पुढे आलं होतं, त्यानंतर मुंबई पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. 

6/7

पोलिसांनी सांगितलं की, हिरे व्यापारी ज्या काही लोकांशी त्याच्या फोनवर बोलला त्यापैकी देवोलिना ही एक होती.  

7/7

मात्र, चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिला सोडून दिलं. बिग बॉसपूर्वी, देवोलीनाने अभिनेत्री दिव्या भटनागरच्या मृत्यूसाठी तिचा पती गगन गब्रूला जबाबदार धरल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती.  तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते, ज्यामध्ये तिने म्हटलं होतं की, गगन दिव्यावर अत्याचार करायचा आणि तिच्या मृत्यूलाही तोच जबाबदार आहे.