सरकार देणार LPG चं मोफत कनेक्शन आणि १६०० रुपये, जाणून घ्या कसे मिळणार?

Feb 02, 2021, 16:29 PM IST
1/4

उज्वला स्कीमशी १ करोड लोकं जोडले गेलेत

उज्वला स्कीमशी १ करोड लोकं जोडले गेलेत

लवकरच या योजनेशी एक करोड महिला उज्वला स्कीमचा लाभ घेणार आहे. पंतप्रधान उज्वला योजनेच्या अंतर्गत सरकार गरीब रेषेच्या खाली असणाऱ्या महिलांना LPG कनेक्शन देणार आहे. या योजनेअंतर्गत ८ करोड BPL कुटुंबियांना मोफत LPG कनेक्शन उपलब्ध करून देणार आहेत.

2/4

काय आहे पंतप्रधान उज्जवल स्कीम

काय आहे पंतप्रधान उज्जवल स्कीम

भारत सरकार उज्वल योजनेंतर्गत प्रत्येक गरीब रेषेखाली असलेल्यांना वित्तीय सहाय्यता योजनेंतर्गंत १६०० रुपयाची आर्थिक मदत करणार आहे. ही रक्कम LPG गॅस कनेक्शन खरेदी करण्यासाठी दिली जाणार आहे. तसेच यामध्ये गॅस खरेदी करण्याकरता आणि पहिल्यांदा LPG सिलेंडर भरण्याकरता येणारा खर्च भरण्याकरात EMI ची व्यवस्था देखील केली आहे. 

3/4

असा भरा फॉर्म?

असा भरा फॉर्म?

आजही गावात करोडो महिला लाकूड आणि शेणाचा वापर करून अन्न शिजवतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. उज्वल योजनेकरता गॅस कनेक्शन करता BPL परिवारातील कोणतीही महिला मागणी करू शकते. याकरता KYC फॉर्म भरून जवळच्या LPG सेंटरमध्ये द्यायचे आहे. यावेळी फक्त १४.२ किलोग्रॅमचा सिलेंडर हवा आहे की ५ किलोग्रॅमचा याची माहिती द्यायची आहे.

4/4

कोणती कागदपत्रे आवश्यक?

कोणती कागदपत्रे आवश्यक?

पंचायत अधिकारी किंवा नगर निगम पालिका अध्यक्षाद्वारे अधिकृत BPL कार्ड, बीपीएल (BPL) रेशन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट साइज फोटो, रेशन कार्डची कॉपी, LIC पॉलिसी, बँक स्टेटमेंट, BPL सूचीच्या नावाची प्रिंट आऊट.