PHOTO: युकेच्या हिटवेव्हची भारतात चर्चा, सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ

UK Heatwave Social Media MEME: युकेचं तापमान भारतात मोठा चर्चेचा विषय होत आहे. युकेच्या तापमानावर होणारे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरवर्षी उन्हाळा वाढत असल्याची माहिती हवामान खात्याकडून दिली जाते. देशाच्या विविध भागात 40 ते 45 डीग्री सेल्सियस इतकं तापमान असतं. हे सांगण्याचं कारण म्हणजे सध्या युकेच्या तापमानाबद्दल भारतीयांना हसू आवरणं कठीण झालं आहे.

Jun 20, 2024, 17:37 PM IST
1/7

युकेमध्ये पारा 26 डीग्री सेल्सियसपेक्षा जास्त झाल्याने, युकेमध्ये हिटवेव्ह घोषित करण्यात आली आहे. अशी माहिती युकेच्या एका वृत्तपत्राने दिली. त्यावरुन भारतीयांना यावर हसू आवरणं अवघड झालं. 

2/7

भारतात एसीचं तापमान हे 26 ते 30 डीग्री सेल्सियस इतकं असतं, त्यामुळे या सगळ्याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मिम्स व्हायरल होत आहेत.   

3/7

बॉलिवूड सिनेमातील गाजलेले सिन आणि त्यातील कलाकारांच्या फोटोंवर  बनवलेल्या या मिम्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

4/7

26 डीग्री सेल्सियस असताना युकेमध्ये हिटवेव्ह जाहीर होते आणि भारतात मात्र 40 डीग्री सेल्सियमध्येही लोक चहा पिणं सोडत नाही. असे मिम्स जोरदार व्हायरल होत आहे. 

5/7

काही युजर्सने घरातल्या एसीचा फोटो शेअर करत, युकेपेक्षा जास्त तापमान आमच्या एसीचे आहे, असं म्हटलं आहे. 

6/7

'सीआयडी', आणि 'तारकमेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील कलाकारांच्या फोटोंवर हे विनोदी मिम्स तुफान व्हायरल होत आहे. 

7/7

या मिम्सच्या माध्यमातून भारतीयांनी याचा चांगलाच आनंद घेतला.