Unseasonal Rain: पुण्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; तर 'या' जिल्ह्यांना गारपिटीसह अलर्ट जारी!

Pune Unseasonal Rain: हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. 

Apr 14, 2023, 19:00 PM IST

Pune Rain News: गेल्या चार ते पाच दिवसांपासून रोजच अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातलं असल्याने बळी राजा संकटात असल्याचं पहायला मिळतंय. पावसासोबत गारांचा सडा पहायला मिळतोय. त्यामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पिकं झोपल्याचं दिसून आलंय. नगदी पिकांच्या फळबागा देखील भुईसपाट झाल्याचं चित्र समोर आलं होतं. अशातच आता पुन्हा हवामान खात्याने (IMD) पावसाचा इशारा दिला आहे.

1/5

हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.

2/5

मराठवाड्यामधील बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पावसामुळे शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या (Farmers) हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जाऊ शकतो.

3/5

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कोकणात.. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट पावसाची शक्यता आहे.

4/5

कांदा, मिरची, टोमॅटो, तूर, डाळिंब, पपई या पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर एकीकडे कांद्याला बाजार भाव नसताना पावसामुळे कांदा सडू लागल्याचं देखील दिसतंय. 

5/5

दरम्यान, पावसाची सततची धार सुरू असताना शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत. त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांसाठी आणखी मदत जाहीर करणार का? असा सवाल आता विचारला जातोय.