IND vs USA : टीम इंडियाला का मिळाल्या 5 पेनल्टी धावा? जाणून घ्या काय सांगतो ICC चा नियम

USA fined 5 penalty runs : आयसीसीच्या स्टॉप क्लॉक नियमानुसार (stop clock rule) 5 धावांचा दंड बसणारा पहिला संघ हा युएसए ठरला आहे. 

| Jun 13, 2024, 00:51 AM IST
1/7

टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धडक

युएसए विरुद्ध टीम इंडियाने 7 गडी राखून विजय मिळवला अन् थेट सुपर 8 फेरीमध्ये धडक मारलीये. टीम इंडियाने युएसएमध्ये सलग तिसरा विजय मिळवलाय.

2/7

अर्शदीप - सूर्यकुमार

टीम इंडियाकडून फलंदाजीमध्ये सूर्यकुमार यादवने उत्तम कामगिरी केली तर गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंग चमकलाय.

3/7

5 धावा अतिरिक्त

मात्र, युएसए गोलंदाजी करत असताना टीम इंडियाला अचानक 5 धावा अतिरिक्त देण्यात आल्याचं जाहीर झालं. नेमकं प्रकरण काय होतं? जाणून घ्या

4/7

स्टॉप क्लॉक नियम

एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी खेळण्याच्या परिस्थितीच्या कलम 41.9 अंतर्गत आयसीसीने स्टॉप क्लॉक नियम लागू केलाय. त्याचा फटका युएसए संघाला बसला.

5/7

वेळाचं बंधन

दोन ओव्हरमधील वेळ नियंत्रित करण्यासाठी घड्याळानुसार वेळाचं बंधन ठेवलं जाईल. या नियमानुसार, फलंदाजी करणाऱ्या संघाला आयत्या 5 धावा मिळणार आहेत. 

6/7

पेनल्टी

जर गोलंदाजी करणारा संघ त्याच्या मागील षटकानंतर 60 सेकंदात पुढील ओव्हर टाकण्यास तयार झाला नाही आणि हे डावात तिसऱ्यांदा घडल्यास 5 धावांचा दंड म्हणजेच पेनल्टी लावली जाईल.

7/7

दोन वेळा वॉर्निंग

गोलंदाजी करणाऱ्या संघाता दोन वेळा वॉर्निंग देखील दिली जाते. जर तरी देखील वेळ पाळली गेली नाही तर पाच धावा अतिरिक्त दिल्या जातात. याचाच फटका युएसए संघाला बसलाय.