सहस्त्रताल ट्रेकिंगमध्ये 11 जणांचा मृत्यू, निसर्गाच्या कुशीतली 'ही' वाट ठरली जीवघेणी; ट्रेकला जाताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?

Uttarakhand Sahastratal trek : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या भागांमध्ये असणारे, पर्वतरांगांमध्ये दडलेले ट्रेक अनेकांच्याच पसंतीचे असतात. गिर्यारोहकांचं, ट्रेकर्सचं या ट्रेकवर विशेष प्रेम.  

Jun 07, 2024, 14:55 PM IST

Uttarakhand Sahastratal trek : हिमालयन ट्रेक (Himalayan Trek) अनेक गिर्यारोहकांच्या पसंतीचे असतात. पण, या ट्रेकला जात असताना काही गोष्टींची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं. 

 

1/8

निसर्गाचा चमत्कार

Uttarakhand Sahastratal trek Bodies of 4 more state trekkers recovered latest updates

Uttarakhand Sahastratal trek : निसर्गाचा चमत्कार दाखवणारे हे ट्रेक अनुभवण्यचीही अनेकांचची इच्छा. पण, यापैकीच एका ट्रेकनं सध्या काहीजणांचा घात केला असून, या बातमीनं ट्रेकिंग क्षेत्रात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

2/8

उत्तराखंड

Uttarakhand Sahastratal trek Bodies of 4 more state trekkers recovered latest updates

उत्तराखंडमधील सहस्त्रताल ट्रेकवर घडलेल्या एका भयंकर घटनेनं आतापर्यंत 11 जणांचा बळी घेतला. 29 मे रोजी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ट्रेकरचा 22 जणांचा एक ग्रुप सहस्त्रताल ट्रेकवर निघाला होता. ज्यानंतर वाटेत आलेल्या वादळामुळं या ग्रुपची वाट भरकटली आणि ते तिथंच अडकले. वातावरण क्षणात बदललं, जोरदार पाऊस सुरू झाला आणि वादळामुळं तिथं धुकं दाटून आलं त्यातच बर्फामुळं इथून ट्रेकरना बाहेर निघण्याची वाट दिसली नाही. 

3/8

11 जणांचा मृत्यू

Uttarakhand Sahastratal trek Bodies of 4 more state trekkers recovered latest updates

प्राथमिक माहितीनुसार या ट्रेकमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून, कडाक्याच्या थंडीमुळं मृत्यू ओढावल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अद्यापही मृतांच्या शवविच्छेदन अहवालातून कोणतीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. 

4/8

चौकशीचे आदेश

Uttarakhand Sahastratal trek Bodies of 4 more state trekkers recovered latest updates

घटनेची माहिती मिळताच सीडीआरएफच्या तुकडीनं तातडीनं हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ट्रेकर्सना वाचवण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले. ज्यामध्ये 11 ट्रेकर्सना वाचवण्यात त्यांना यश मिळालं. ही दुर्घटना पाहता मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सिल्ला कुशकल्याण सहस्त्रताल ट्रेक रुटवर घडलेल्या या घटनेसंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत.   

5/8

लेक ऑफ गॉड्स

Uttarakhand Sahastratal trek Bodies of 4 more state trekkers recovered latest updates

सहस्त्रताल लेक या भागाला 'लेक ऑफ गॉड्स' म्हणजेच देवतांचा तलाव असं म्हटलं जातं. सात तलावांचा समुह या ट्रेकची उंची समुद्रसपाटीपासून अधिक असून, तिथं पोहोचण्यासाठीची वाटही खडतर आहे. या ट्रेकदरम्यान, चारही बाजुंनी अच्छादलेले  पर्वत पाहायला मिळतात. असमान रस्ते, लहानसहान पाणवठे असा प्रवास करत साधारण 9 दिवसांहून अधिक कालावधीत हा ट्रेक पूर्ण होतो. 

6/8

ट्रेकची वाट

Uttarakhand Sahastratal trek Bodies of 4 more state trekkers recovered latest updates

भटवारी येथून या ट्रेकटची सुरुवात होऊन पुढं गॅरी मार्गे ट्रेकर्स कुश कल्याण इथं पोहोचतात. तिसऱ्या दिवशी कुश कल्याण इथं त्यांचा मुक्काम असतो. इथून पुढं क्यारकी बुग्याल मार्गे हा प्रवास सुरू होतो आणि ट्रेकर लंब ताल येथे पोहोचतात. मजल-दरमजल करत हा प्रवास पुढे जातो आणि ट्रेकर्स त्याच्या निर्धारित स्थळी पोहोचतात. महत्त्वाचा मुद्दा असा, की ट्रेकला आणि त्यातही हिमालयातील पर्वतरांगांमध्ये असणाऱ्या ट्रेकला गेलं असता काही गोष्टींची काळजी घेतली जाणं अतीव महत्वाचं आहे.   

7/8

काय काळजी घ्यावी?

Uttarakhand Sahastratal trek Bodies of 4 more state trekkers recovered latest updates

चांगली ग्रिप असणारे शूज वापरणं, ट्रेकदरम्यान कुठेही पाय ठेवण्याआधी जमीन पक्की आहे ना याची खात्री करणं, सोबतच्या छडीचा वापर करत शरीराचा भार त्यावर झेलणं या काही महत्त्वाच्या गोष्टींचं पालन करावं. च्याशिवाय ट्रेकमध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये लहान लहान थांबे घेत शक्य असेल तेव्हा सकाळच्या वेळेत ट्रेक सुरु करण्याचा प्रयत्न करावा.   

8/8

आवश्यक साहित्य

Uttarakhand Sahastratal trek Bodies of 4 more state trekkers recovered latest updates

ट्रेकचे कपडे, गरम कपडे आणि पाण्य़ाची बाटली कायम सोबत ठेवावी. याशिवाय बॅगेत एनर्जी ड्रींक, चॉकलेट, सुका मेवा सोबत ठेवावा. याशिवाय बॅगेत रॉक क्लायम्बिंग, रॅपलिंगचा दोर किंवा तत्सम आवश्यक साहित्य सोबत बाळगावं. याशिवाय प्राथमोपचार किट सोबत असणं महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रेक सुरु करण्यापूर्वी किमान अर्धा तास व्यायाम केला गेलाच पाहिजे. यामुळं शरीरातील स्नायूंची कार्यक्षमता वाढून ते तुमची साथ देतात.