बिग बॉसनंतर 'वडापाव गर्ल' पुन्हा चर्चेत, बिग बींची भेट घेत बनणार 'कोरडपती'?

बिग बॉस OTT 3 नंतर 'वडापाव गर्ल' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चंद्रिकाने अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.  

| Aug 24, 2024, 14:16 PM IST
1/7

वडापाव गर्ल चर्चेत

बिग बॉस OTT 3 मधून बाहेर पडल्यानंतर, 'वडापाव गर्ल' उर्फ चंद्रिका दीक्षित सतत चर्चेत असते. 

2/7

अमिताभ बच्चन

अलीकडेच तिला बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी भेटण्याची संधी मिळाली होती. अमिताभ बच्चन यांना भेटणे ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धीआहे. 

3/7

फोटो शेअर

तिने इन्स्टाग्रामवर अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्याध्ये ती बिग बींच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहे. 

4/7

कॅप्शन चर्चेत

'वडापाव गर्ल'ने हे फोटो शेअर करताना मला अमिताभ बच्चन यांना भेटण्याचे भाग्य लाभले असं कॅप्शन दिलं आहे. 

5/7

कौन बनेगा करोडपती

यासोबतच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर दिसत आहे.

6/7

भावूक

अमिताभ बच्चन यांना भेटताच ती भावूक झाली आणि त्यांच्याशी ती हात जोडून बोलताना दिसली. 

7/7

केबीसीच्या सेटवर

त्यामुळे बिग बॉसनंतर 'वडापाव गर्ल' करोडपती बनण्यासाठी केबीसीच्या सेटवर पोहोचल्याने फोटो आणि व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून स्पष्ट झाले आहे.