Valentine Day : वडिलांच्या फिटनेस ट्रेनरसोबत झालं प्रेम, आमिरच्या मुलीचा खुलासा

Feb 12, 2021, 09:13 AM IST
1/5

नुपूर शिखरला डेट करतेय इरा खान

नुपूर शिखरला डेट करतेय इरा खान

इरा आपला फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरला डेट करतेय. तिने इंस्टाग्रामवर नुपूरसोबत अनेक फोटो शेअर केलेयत. त्यावर तिने छानंशी कॅप्शन देखील दिलीय. 'यासोबत आणि शपथ पूर्ण करण्याचा सन्मान' अशी कॅप्शन तिने दिलीय.  

2/5

इंस्टाग्राम शेअर केले फोटो

इंस्टाग्राम शेअर केले फोटो

शेअर केलेल्या फोटोमध्ये इरा आणि नुपूर एकमेकांना प्रेमाने पाहतायत. आपले प्रेम व्यक्त करतानाच्या फोटोत दोघेही खूप सुंदर दिसतायत. नुपूर शिखर हा इरा खानसोबत तिचे वडील अभिनेता आमिर खानला देखील ट्रेन करतो.    

3/5

नुपूरच्या नावाचा बनवला टॅटू

नुपूरच्या नावाचा बनवला टॅटू

इराने नुपूरच्या नावाचा टॅटू देखील बनवलाय. तिने यासंदर्भातील एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केलीय. बकेट लिस्टमधील आयटम 5 पूर्ण अशी कॅप्शन त्याला दिलीय. या पोस्टनंतर ती आपल्या रिलेशनशीपच्या बातम्यांमुळे चर्चेत राहीली.  

4/5

लॉकडाउन दरम्यान वाढली जवळीक

लॉकडाउन दरम्यान वाढली जवळीक

इरा आणि नुपूर कोरोना वायरस लॉकडाऊन दरम्यान एकमेकांच्या अधिक जवळ आले. दोघांनी एकत्र आमिर खानच्या महाबळेश्वर येथील फार्म हाऊसवर सुट्ट्या घालवल्या.  

5/5

बॉलीवुड सेलेब्सने दिली प्रतिक्रिया

बॉलीवुड सेलेब्सने दिली प्रतिक्रिया

इराच्या रिलेशनशिपची बातमी समोर आल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्राी फातिमि सना शेखने इराच्या पोस्टवर इमोजी पाठवलाय. तर अभिनेता करणवीर बोहराने देखील यावर 'किती प्रेमळ' अशी कमेंट केलीय.