'या' कट्टर इस्लामिक देशात व्हॅलेंटाईन डे साजरा केल्यास मिळते शिक्षा

फेब्रुवारी महिन्यात जगभरातील सर्वच देश व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा करतात. 14फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस साजरा करण्यास सर्वच वयोगटातील मंडळी उत्सुक असतात. मात्र काही इस्लामिक देशात व्हॅलेंटाईन डे साजरा करणं हा गुन्हा मानला जातो.

Feb 07, 2024, 17:50 PM IST

फेब्रुवारी महिन्यात जगभरातील सर्वच देश व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा करतात. 
14फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस साजरा करण्यास सर्वच वयोगटातील मंडळी उत्सुक असतात. 
मात्र काही इस्लामिक देशात व्हॅलेंटाईन डे साजरा करणं हा गुन्हा मानला जातो.

1/6

पाकिस्तान

पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याला पाकिस्तानी कोर्टाचा तीव्र विरोध आहे. हा कट्टर इस्लामिक देशांपैकी एक आहे. असं सांगीतलं जातं की, दुसऱ्या देशातील संस्कृतीचे अनुकरण करणं हे ईस्लाम धर्माच्या विरोधात आहे. त्यामुळे  व्हॅलेंटाईन डेला रस्त्यांवर कडक बंदोबस्त करण्यात येतो. 

2/6

इंडोनेशिया

इंडोनेशियामध्ये इस्लाम धर्मीय नागरीकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे 14फेब्रुवारीला   जग प्रेमाचा दिवस साजरा करत असलं तरी इंडोनेशियामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी आहे. येथील सुराबा आणि मकासर या कट्टरपंथीयांचा व्हॅलेंटाईन डेला तीव्र विरोध असतो. 

3/6

सौदी अरेबिया

इस्लामिक देशांमध्ये  सौदी अरेबियाचं सगळ्यात पहिलं नाव येतं. हा देश प्रगतशील असण्याबरोबरच  ईस्लाम धर्मिय देश म्हणूनही ओळखला जातो. सौदी अरेबियामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करणं कायद्याने गुन्हा आहे. असं केल्यास सौदी अरेबियामध्ये अटक करण्यात येते. 

4/6

मलेशिया

मलेशियातील एका हॉटेलमध्ये काही वर्षांपुर्वी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला होता. त्यावेळी तिथल्या पोलिस यंत्रणेने हॉटेलमध्ये तोडफोड केली होती. मलेशिया हा मुस्लिम देश असून ईस्लाम धर्मिय लोकांची संख्या इथे मोठ्या प्रमाणात आहे. 

5/6

उझबेकिस्तान

 जहिरुद्दिन मोहम्मद बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. त्याचा  जन्म 14 फेब्रुवारीला उझबेकिस्तानमध्ये झाला. त्यामुळे येथील लोक 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे ऐवजी बाबरची जयंती म्हणून  साजरा करतात. 

6/6

इराण

इराणमध्ये इस्लामिक रुढी परंपराचे कटाक्षानं पालन केलं जातं. या देशात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याला इथल्या सरकारचा तीव्र विरोध आहे.