Vastu Tips: रात्री झोपताना बेडजवळ ठेऊ नका 'या' गोष्टी; वैवाहिक जीवनात येतील अडथळे

Vastu Tips for Bedroom: माणसांच्या अशा अनेक सवयी असतात, ज्याकडे ते दुर्लक्ष करतात. वास्तुशास्त्रानुसार, या सवयी चांगल्या मानल्या जात नाहीत. असं म्हटलं जातं, या सवयींमुळे मां लक्ष्मी नाराज होतात. यामुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सवयीबद्दल सांगणार आहोत. रात्री झोपताना बेडजवळ कोणत्या गोष्टी ठेऊ नयेत, याबाबत माहिती घेऊया.

Jan 01, 2023, 21:53 PM IST
1/5

बऱ्याचदा लोकं रात्री झोपताना बेडजवळ पाण्याची बाटली ठेवतात. वास्तुशास्त्राप्रमाणे, असं करणं अशुभ मानलं जातं. पाण्याची बाटली जवळ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते. परिणामी अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.  

2/5

काही लोकांना रात्री झोपण्यापूर्वी पेपर तसंच पुस्तक वाचण्याची सवय असते. झोप यावी यासाठी ते उशीखाली देखील या गोष्टी ठेवतात. वास्तुशास्त्रात हे योग्य मानलं जात नाही. यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.

3/5

बेडरुममध्ये जेवणाची अनेकांची सवय असते. यावेळी लोकं न धुतलेली भांडी बेडजवळ ठेवतात. असं केल्यामुळे रात्री भयानक स्वप्नं पडण्याती शक्यता असते. शिवाय वैवाहिक जीवनात येऊ शकतात अडथळे.

4/5

रात्री झोपताना लोकं सोन्याचे दागिने काढतात आणि उशीखाली ठेवतात. मात्र यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते.

5/5

वास्तुशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, घाण किंवा न धुतलेले कपडे बेडवर ठेवू नयेत. यामुळे आर्थिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.