Vat Punima Ukhane: 'वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला...'; वटपौर्णिमेनिमित्त मराठी उखाणे

Vat Purnima Special Ukhane in Marathi: हिंदू धर्मात ज्येष्ठ महिन्याला विशेष महत्त्व आहे. कारण या महिन्यापासूनच सणांना सुरुवात होते. पहिला सण येतो तो 'वटपौर्णिमा'. हिंदू धर्मात या वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले. यामुळे या दिवशी वडाची पूजा केली जाते. वटवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वडाला पवित्र वृक्ष म्हणूनही ओळखलं जातं. यामध्ये ब्रम्ह, विष्णू आणि शंकराचा वास आहे. महिला आपलं सौभाग्य आणि आंनदमय वैवाहिक जीवनासाठी वटपौर्णिमेला पूजा करतात. या दिवशी महिला एकत्र वडाची पूजा करतात.

| Jun 14, 2024, 16:49 PM IST
1/14

कधी आहे वटपौर्णिमा आणि त्याचा शुभ मुहूर्त

Vat Purnima Marathi Ukhane

हिंदू पंचागानुसार, ज्येष्ठ पौर्णिमा 21 जून रोजी सकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी याचा शुभ मुहूर्त सुरु होतो. तर तो दुसऱ्या दिवशी म्हणजे 22जून रोजी सकाळी 6 वाजून 38 मिनिटांनी संपतो. त्यामुळे हा उपवास 21 जूनरोजीच महिलांनी ठेवावा. 

2/14

वटपौर्णिमा उखाणे

Vat Purnima Marathi Ukhane

शहा जहानने मुमताजसाठी, बांधला महाल ताज, ___रावांचे नाव घेते, वटपौर्णिमा आहे आज.

3/14

वटपौर्णिमा उखाणे

Vat Purnima Marathi Ukhane

फुलांच्या बागेत, फुलली मोहक शेवंती, ___राव सुखी राहावेत, हि परमेश्वराला विनंती.

4/14

वटपौर्णिमा उखाणे

Vat Purnima Marathi Ukhane

वटपौर्णिमा आहे खरं तर, सुवासिणींसाठी मोठा सण, ___रावांनी जिंकले, पहिल्याच भेटीत माझे मन.

5/14

वटपौर्णिमा उखाणे

Vat Purnima Marathi Ukhane

वटपौर्णिमा आहे खरं तर, सुवासिणींसाठी मोठा सण, ___रावांनी जिंकले, पहिल्याच भेटीत माझे मन.

6/14

वटपौर्णिमा उखाणे

Vat Purnima Marathi Ukhane

वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाला फेरे घालते साथ, ___रावांची लाभो मला, जन्मोजन्मी साथ.

7/14

वटपौर्णिमा उखाणे

Vat Purnima Marathi Ukhane

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी, ___रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या दिवशी.

8/14

वटपौर्णिमा उखाणे

Vat Purnima Marathi Ukhane

खाण तशी माती, ___राव माझे पती, आणि मी त्यांची सौभाग्यवती.  

9/14

वटपौर्णिमा उखाणे

Vat Purnima Marathi Ukhane

वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग, ___राव सोबत असताना, धरतीही वाटे स्वर्ग.  

10/14

वटपौर्णिमा उखाणे

Vat Purnima Marathi Ukhane

तांदुळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस, ___राव आहेत माझी पहिली चॉईस.

11/14

वटपौर्णिमा उखाणे

Vat Purnima Marathi Ukhane

वडाची पूजा करते, वटपौर्णिमेच्या दिवशी, ___रावांसाठी दिर्घायुष्य मागते संपूर्ण सोबती.  

12/14

वटपौर्णिमा उखाणे

Vat Purnima Marathi Ukhane

वटपौर्णिमेला भरते, सुवासिनींची ओटी, ___रावांचे नाव, सदा माझ्या ओठी.

13/14

वटपौर्णिमा उखाणे

Vat Purnima Marathi Ukhane

वटपौर्णिमेला आहे वानाचे महत्व, ___रावांची वाढो किर्ती आणि महत्व.

14/14

वटपौर्णिमा उखाणे

Vat Purnima Marathi Ukhane

वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करावे, पती म्हणून ___राव जन्मो जन्मी मिळावे.