ऑफीस असो की घर, दुपारी 'पॉवर नॅप' घ्याच; फायदे वाचून आजपासूनच सुरुवात कराल!

Power Nap Benefits: दुपारी जेवल्यानंतर खूप झोप येते. मात्र कामाच्या ठिकाणी काही नॅप घेता येत नाही. मात्र, तुम्हाला माहितीये का हा दुपारचा पॉवर नॅप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ऑफिसचे काम, दिवसभराची धावपण आणि ताण-तणाव हलका करण्यासाठी काही मिनिटांचा पॉवर नॅप खूप गरजेचा असतो. 

| Jun 14, 2024, 16:46 PM IST
1/7

ऑफीस असो की घर, दुपारी 'पॉवर नॅप' घ्याच; फायदे वाचून आजपासूनच सुरुवात कराल!

health benefits Why We Should Take Power Nap EveryDay

दुपारच्या पॉवर नॅपचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठीही खूप गरजेचे आहे. दुपारी पॉवर नॅप घेण्याचे काय फायदे आहेत व हा पॉवर नॅप कसा व कधी घ्यायचा याची माहिती जाणून घेऊया. 

2/7

एनर्जी व प्रोडक्टिव्हिटी वाढते

health benefits Why We Should Take Power Nap EveryDay

दुपारच्या जेवल्यानंतर कधीकधी सुस्ती येते किंवा शरीरात थकवा जाणवू लागतो. अशावेळी एक छोटासा पॉवर नॅप उर्जा वाढवण्यास मदत करतो. नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या मते, 10-20 मिनिटांची झोप आपली एकाग्रता आणि सतर्कता वाढवण्यास मदत करते. यामुळं आपण उर्वरित दिवशी जास्त प्रोडक्टिव्ह काम करु शकतो. 

3/7

क्रिएटिव्हीटी वाढते

health benefits Why We Should Take Power Nap EveryDay

पॉवर नॅपनंतर आपला ब्रेन नव्याने काम करण्यास सज्ज होतो. त्यामुळं आपली विचार करण्याची क्षमता आणि क्रिएटिव्हीटी वाढण्यास मदत होते. अनेक महान वैज्ञानिक आणि कलाकार जसे की अल्बर्ट आइन्स्टीन आणि लियोनार्डो दा विंचीदेखील पॉवर नॅपचा प्रयोग करायचे. 

4/7

हृदयाचे आरोग्य सुधारते

health benefits Why We Should Take Power Nap EveryDay

दररोज पॉवर नॅप घेतल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. जे नियमितपणे पॉवर नॅप घेतात त्यांना हृदयाच्या तक्रारी कमी होतात. कारण झोप ताण-तणाव कमी करते. ज्यामुळं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. 

5/7

स्मरणशक्ती वाढवते

health benefits Why We Should Take Power Nap EveryDay

पॉवर नॅपमुळं स्मरणशक्ती वाढवण्याची क्षमता आहे. झोपेच्या वेळी आपला मेंदू माहिती गोळा करणे आणि साठवून ठेवणे ही काम करतो. त्यामुळं स्मरणशक्ती वाढवते. 

6/7

मुड सुधारतो

health benefits Why We Should Take Power Nap EveryDay

दुपारी पॉवर नॅप घेतल्याने मुड सुधारतो. ताण-तणाव, चिडचिड कमी कमी होते. त्यामुळं सोशल आणि पर्सनल लाइफ सुधारते. 

7/7

पॉवर नॅप घेण्याची योग्य पद्धत

health benefits Why We Should Take Power Nap EveryDay

वेळ- पॉवर नॅपची वेळ 10-20 मिनिटे असायला हवी. यापेक्षा जास्त झोप घेतल्यास थकवा जाणवतो जागा- पॉवर नॅप घेण्यासाठी एक आरामदायक आणि शांत जागा निवडा पॉवर नॅप घेण्याची योग्य वेळ दुपारी 1-3 च्या मध्ये आहे.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)