वीरू देवगण काळाच्या पडद्याआड

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे निधन झाले आहे. 

May 27, 2019, 17:37 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे निधन झाले आहे. वीरू देवगण यांची काही दिवसांपासून तब्येत खालावली होती. ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध ऍक्शन डिरेक्टर होते. 'स्टंटमॅन' म्हणून वेगळी ओळख असणाऱ्या वीरु देवगण यांच्या जाण्याने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या वीरू देवगण यांचे अभिनयाचे स्वप्न अपूरे राहिले आहे.  

1/5

वीरू देवगण अभिनेते म्हणून नावास आले नसले तरी, त्यांनी आपल्या कारकिर्दीत उत्तम दिग्दर्शकाची भूमिका बजावली.   

2/5

वडिलांचे स्वप्न अजय देवगणने पूर्ण केले. तसेच तो आता एक उत्कृष्ट कलाकार आहे. त्याच्या अनेक चित्रपटांनी चाहत्यांच्या मनात घर केले आहे.  

3/5

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून वीरू देवगण यांच्या मृत्यूची बातमी शेअर केली. जवळपास ८० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी दिग्दर्शन केले आहे.  

4/5

विलेपार्ले येथील स्मशानभूमीत संध्याकाळी सहा वाजता वीरू देवगण यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. 

5/5

जवळपास ८० हून अधिक चित्रपटांमध्ये साहसदृश्य साकारण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. वीरू देवगण यांनी साहसी दृश्य दिग्दर्शन आणि दिग्दर्शनाबरोबरच अभिनय क्षेत्रातही आपले नशीब आजमावले होते.