SSC Exam: दहावीच्या परीक्षेसाठी अत्यंत कडक नियम; प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती घेणार आणि...
SSC Exam: राज्यात 15 लाख 77 हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. राज्यातील 533 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
SSC Exam 2023: 3 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरु होत आहेत. यंदा परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात करण्याचा बोर्डाचा प्रयत्न आहे. 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान ही परीक्षा होणार आहे. परीक्षेआधी प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती घेऊनच त्याला वर्गात सोडलं जाणार आहे. त्यासाठी पोलिस पाटील, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे. तसंच पेपर सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळणार आहे.