Dahi Handi 2024: विहिरीवरच्या दहीहंडींचा थरार, महाराष्ट्रात कुठे आणि कशी साजरी केली जाते 'ही' दहीहंडी
Dahi Handi 2024 : जन्माष्टमीनंतर आता सगळीकडे गोविंदांच्या दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील एका गावात आगळावेगळा गोपाळकाला साजरा केला जातो. 'विहिरीवरची दहीहंडी' म्हणून हा गोपाळकाला जगभरात लोकप्रिय आहे.
मराठी माणसाच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे 'दहीहंडी". गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला की गोविंदांना वेध लागतात ते दहीहंडी फोडण्याचे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात सगळीकडेच दहीहंडी हा सण उत्साहात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने तर कुछे कलाकार मंडळीच्या उपस्थितीत, लाखोंच्या बक्षीसांनी भरलेली ही दहीहंडी असते. पण महाराष्ट्रात एक असं गाव आहे जेथे आजही पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी केली जाते. महाराष्ट्रात कुठे आणि कशी साजरी केली जाते ही 'विहिरीवरची दहीहंडी'.