असं एक गाव ! इथं एकही रस्ताच नाही...लोक कार - बाईकऐवजी असा करतात प्रवास
Village Without Roads : विना रस्त्याचे गाव. तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. गावात रस्ता नसला तरी गावाचा विकास थांबलेला नाही. मस्त टुमदार घरे आणि स्वच्छ परिसर. छान वातावण. आनंदी लोक अशीच या गावाची ओळख आहे. आम्ही बोलत आहोत ते गिथॉर्न या गावाबद्दल.
Village Without Roads : या गावात एकही रस्ता नाही, लोक कार आणि बाइकऐवजी फक्त बोट खरेदी करतात आणि आपला प्रवास करतात. गाव म्हणजे कच्ची घरं, छोटे-छोटे रस्ते, सगळीकडे हिरवळ, प्रत्येकाकडे रोजगारासाठी पशुधन आणि शेतजमीन. आजकाल गावे, शहरे आणि शहरे ही सर्व रस्त्यांनी एकमेकांशी जोडलेली आहेत. पण आश्चर्य वाटेल की या जगात असे एक गाव आहे, जिथे आजही रस्ता नाही. या गावात कोणीही कार किंवा बाईक घेत नाही तर बोट घेतो.