विराट कोहलीने 'वामिका' नाव ठेवण्यामागचं खरं कारण? जाणून घ्या इतर खेळाडूंच्या मुलांची नावे

Feb 02, 2021, 18:24 PM IST
1/8

वामिका

वामिका

विराट-अनुष्का (Virat-Anushka)च्या मुलीचं नाव 'वामिका' असं आहे. याचा अर्थ देवी दुर्गा. हे नाव शंकर देवाच्या अर्धांगिनीकरता आहे. शंकर देवाच्या डावीकडे उभी असते वामिका.

2/8

जीवा धोनी

जीवा धोनी

एमएस धोनी आणि साक्षी धोनी यांच्या मुलीचं नाव आहे `जीवा`.  जीवा एक पारसी शब्द आहे. ज्याचा अर्थ सुंदरता, चमक, कुशाग्र आणि प्रकाश असा आहे.

3/8

आजीन गंभीर

आजीन गंभीर

भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरला दोन मुलं आहेत. आजीना आणि अनाइजा अशी  त्यांची नावे आहेत. या दोघांची नावे अरेबिक आहेत. आजीनचा अर्थ सुंदरता.

4/8

एरियाना नेहरा

एरियाना नेहरा

आशीष नेहरा आणि पत्नी रुश्मा यांची दोन मुले आहेत. त्यांच्या मुलीचं नाव एरियाना असून याचा अर्थ शुद्ध, पवित्र असा आहे. 

5/8

ग्रेसिया रैना

ग्रेसिया रैना

सुरेश रैना आणि पत्नी प्रियंका चौधरी 2016 रोजी आई-बाबा झाले. या दोघांनी आपल्या मुलीचं नाव ग्रेसिया असं ठेवलं आहे. याचा अर्थ ईश्वराची कृपा असं आहे. 

6/8

हिनाया हीर

हिनाया हीर

टीम इंडियाचा माजी स्टार गोलंदाज हरभजन सिंहला एक मुलगी आहे. हरभजनने आपल्या मुलीचं नाव हिनाया हीर असं ठेवलं आहे. याचं नाव अभिव्यक्ती. 

7/8

अखीरा आणि आध्या

अखीरा आणि आध्या

भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज आर अश्विनला दोन मुली आहे. २००८ साली मोठ्या मुलीचा जन्म झाला. तिचं नाव आध्या ठेवलं असून आध्याच्या नावाचा अर्थ देवी दुर्गा असा आहे. तर दुसऱ्या मुलीचं नाव अखिरा असं आहे. याचा अर्थ गणेश.   

8/8

मयास कुंबळे

मयास कुंबळे

अनिल कुंबळेला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. अनिल कुंबळेने घटस्फोटीत असलेल्या चेतनाशी लग्न केलं आहे. कुंबळेने चेतनाच्या पहिल्या नवऱ्या मुलीला आरूनीला फक्त स्विकारलंच नाही तर तिला देखील आपलं नाव दिलं. कुंबळेंच्या दोन मुलांची नावे आहेत मयास कुंबळे आणि मुलीचं नाव आहे स्वाती कांबळे. मयास कुंबळे हे वेगळं नाव असून सोशल मीडियावर याची भरपूर चर्चा आहे.