Most Hundreds in IPL: कुणालाच जमलं नाही ते विराट कोहलीने करून दाखवलं, गुजरातविरुद्ध रचला 'महारेकॉर्ड'

Most Hundred in IPL History: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 70 व्या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) इतिहास रचला आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावताच त्याच्या नावावर आयपीएलचा (IPL 2023) असा विक्रम झाला जो आजपर्यंत कोणीही करू शकले नाही.

May 22, 2023, 10:50 AM IST

Most Hundred in IPL History: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 70 व्या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) इतिहास रचला आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावताच त्याच्या नावावर आयपीएलचा (IPL 2023) असा विक्रम झाला जो आजपर्यंत कोणीही करू शकले नाही.

1/5

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 197 धावा केल्या आहेत. तर आता गुजरातसमोर 198 धावांचं टार्गेट दिलं. विराट कोहलीने झुंजार खेळी करत शतक झळकावलं. 

2/5

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतके ठोकणारा विराट पहिला फलंदाज ठरला आहे. विराटने या मोसमातील हे दुसरे शतक झळकावलंय.

3/5

आयपीएलच्या इतिहासातील विराट कोहलीचं हे सातवं शतक आहे. गेल्या सामन्यात कोहलीने शतक झळकावून गेलच्या रेकॉर्डची बरोबरी केली आणि आता गेलने मागे टाकलंय.

4/5

लागोपाठ दोन सामन्यात दोन शतके ठोकणारा विराट कोहली हा तिसरा फलंदाज ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या शिखर धवनने 2020 मध्ये हा पराक्रम केला होता. 

5/5

दरम्यान, राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरने देखील अशी कामगिरी केली होती. 2022 मध्ये बटलरने  दोन सामन्यात दोन शतके ठोकली होती. त्यानंतर विराट कोहली हा तिसरा फलंदाज ठरलाय.