जया एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आकर्षक फुलांनी सजवले

श्री विठ्ठल रुक्मिणी ची महापूजा संपन्न  

Feb 23, 2021, 09:30 AM IST

जया एकादशी निमित्ताने श्री विठ्ठलाची महापूजा मंदिर समिती सदस्या अॅड माधवी निगडे यांच्या उपस्थितीत झाली. तर रुक्मिणी मातेची महापूजा सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते झाली. अगदी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पाळून आजची महापूजा झाली. यावेळी विठ्ठलास शुभ्र रंगाचा पोशाख तर रुक्मिणी मातेस शुभ्र रंगाची आणि लाल किनार असलेली पैठणी परिधान केली.

 

1/7

आज जया एकादशी निमित्ताने संपूर्ण मंदिर आकर्षक सुंदर फुलांनी सजवले आहे.   

2/7

देवाचा आणि मातेचा देव्हारा, गाभारा चौखांबी, सोळखांबी सह देऊळ सुंदर फुलांनी सजले आहे.  

3/7

माघ वारीला लातूर जिल्ह्यातील औसेकर महाराज फडास महत्व आहे. औसेकराच्या चक्री भजनाने या वारीची सांगता होते.  

4/7

पंढरपुरात संचारबंदी असल्यामुळे मंदिर परिसरासह संपूर्ण पंढरपूर शहरात शुकशुकाट दिसून येत आहे.   

5/7

मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून भाविकांनी मंदिराकडे येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन काळजी घेत आहे. 

6/7

7/7