Vivah Muhurat 2023 : जूनमध्ये उडवून द्या लग्नाचा बार, जाणून घ्या शुभ मुहूर्तांची यादी

Vivah Muhurat 2023 in Marathi: मार्च आणि एप्रिल महिन्यात लग्नाला शुभ मुहूर्त नसल्याने अनेक इच्छुक जोडप्यांची लग्ने खोळंबली होती. मात्र आता या जोडप्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जूनमध्ये लग्नाचा बार तुम्ही उडवू शकता. यावर्षी लग्नासाठी मे, जून महिन्यात शुभ मुहूर्त आहेत. मार्च महिन्यात बोटावर मोजण्या इतकेच तर एप्रिलमध्ये एकही मुहूर्त नसल्याने अनेक लग्न खोळंबली होती. मात्र जूनमध्ये बरेच मुहूर्त असल्याने लग्नासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना दिलासा मिळाला आहे. 

May 25, 2023, 16:01 PM IST
1/6

Vivah Muhurat 2023

येत्या काही दिवसात मे महिना संपणार आहे. यामुळे तुम्ही पण लग्नासाठी शुभ मुहुर्त शोधत असाल तर तुम्ही जून 2023 मध्ये येणारा शुभ मुहूर्तापैकी कोणताही एक मुहूर्त निवडू शकता.

2/6

Vivah Muhurat 2023

जून 2023 मध्ये ग्रह आणि नक्षत्रांच्या संयोगामुळे लग्नासाठी अनेक शुभ योग तयार होत आहेत. या शुभ काळात जोडप्यांसाठी विवाह करणे खूप शुभ असते. जून महिन्यात येणार्‍या शुभ विवाह मुहूर्ताबद्दल जाणून घ्या तारखा...

3/6

Vivah Muhurat 2023

जून 2023 या महिन्यात 1, 3, 5, 6, 7, 11, 12, 23, 24, 26, 27 या दिवशी मुहूर्त असून एकूण 11 शुभ मुहूर्त आहेत.  

4/6

Vivah Muhurat 2023

मार्च, एप्रिल या दीड महिन्यात शुभ मुहूर्त नसल्यामुळे लग्न इच्छूक जोडप्यांचे पुढील नियोजन रखडली होती. परिणामी केटरिंग तसेच मंगल कार्यालयांना याचा फटका बसला.  

5/6

Vivah Muhurat 2023

विवाह सोहळा दणक्यात साजरे करताना बँड बाजा, डीजेची ऑर्डर दिली जाते. त्यासाठी जवळपास सुरुवात झाली आहे. याशिवाय केटरिंगची ही जुळवावा करावी लागत आहेत. 

6/6

Vivah Muhurat 2023

दीड महिने लग्नाचे मुहूर्त नसल्याने मे, जून महिन्यात मंगल कार्यालयांचे बुकिंग आतापासूनच सुरू झाले आहे. अनेक लग्न खोलंबल्यांचे बुकिंग जोरात सुरु आहे. तसेच अनेकांना तर हॉलही मिळेनासे झाले आहेत.    (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)