Har Ghar Tiranga Certificate: हर घर तिरंगा प्रमाणपत्र हवं आहे ? 'ही' आहे प्रक्रिया

How To Get Har Ghar Tiranga Certificate: हर घर तिरंगा प्रमाणपत्र हवं आहे ? 'ही' आहे प्रक्रिया. भारत 15 ऑगस्ट 2024 रोजी आपला 78वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल. स्वातंत्र्यसैनिकांच्या अविरत मेहनतीमुळे ब्रिटीश राजवटीपासून मुक्त होऊ शकलो. 

Aug 14, 2024, 13:27 PM IST
1/9

2022 मध्ये भारत सरकारने आझादी का अमृत महोत्सव मोहीम सुरू केली. त्यावर्षी वेबसाइटमार्फत 5 कोटींहून अधिक लोकांनी सेल्फी शेअर करत स्वातंत्र्यदिन साजरा केला. 

2/9

यावर्षीदेखील भारत सरकारने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे. भारतीय ध्वजाचा हा उत्सव दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवस आधीच सुरू केला जातो. 

3/9

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक भारतीय नागरीकाला भारतीय ध्वजाचे पालन वाढवण्यासाठी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. 

4/9

भारत सरकारने 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट यादरम्यान राज्यांमध्ये तिरंगा यात्रांचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर 14 ऑगस्ट रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये मूक मोर्चा काढून स्मृती दिन साजरा केला जाईल. 

5/9

जर तुम्हालासुद्धा या मोहिमेचा भाग व्हायचं असेल तर आत्ताच खाली दिलेल्या माहितीचा वापर करा. 

6/9

harghartiranga.com या वेबसाइटवर जा, त्यानंतर तुमच्या selfie वर क्लिक करा आणि नंतर click to participate किंवा next हा पर्याय निवडा 

7/9

टॅब तुम्हाला एका पानावर तुमची आवश्यक देण्यास सांगेल जसे की तुमचे नाव, फोन नंबर, राज्य आणि देश .  

8/9

तुमचा तपशील काळजीपूर्वक भरा आणि तुम्हाला अशा पेजवर पाठवेल ज्यावर तुम्हाला तिरंग्यासोबत तुमचा सेल्फी अपलोड करायचा आहे. 

9/9

वेबसाइटवर फोटो शेअर करण्याआधी पोर्टलला परवानगी द्या. तुम्ही परवानगी दिल्यानंतर 'जनरेट सर्टिफिकेट' या पर्यायावर क्लिक करा. याद्वारे तुम्हाला तुमचे प्रमाणपत्र मिळेल