आज भावा-बहिणीसोबत बसून बघा बॉलिवूडमधील 'हे' 6 चित्रपट

बॉलिवूड म्हटल्यावर आपल्या वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहायला मिळतात. त्यातही भावा-बहिणीचं सुंदर नातं हे आपल्याला पाहायला मिळतं. रक्षाबंधनच्या निमित्तानं काही असे चांगल्या चित्रपटांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत... जे चित्रपट तुम्ही आज तुमच्या भावा-बहिणीसोबत नक्कीच पाहू शकतात.   

| Aug 19, 2024, 17:11 PM IST
1/8

2/8

भावा-बहिणीच्या नात्यात इमोशन्स, प्रेम, भांडणं ही वेगळ्या पद्धतीनं मोठ्या पडद्यावर मांडल्या आहेत. त्यामुळे तुम्ही हसाल आणि भावूकही व्हाल. या दोघांना 

3/8

अक्षय कुमारचे चित्रपट आता चालत नसले तरी देखील त्यानं वेगवेगळ्या चित्रपटातून अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. 2022 मध्ये 'रक्षाबंधन' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यातून भावा आणि बहिणीच्या नात्यातील प्रेम पाहायला मिळालं. या चित्रपटाची पटकथा ही भावूक करणारी आहे. 

4/8

सूरज बडजात्यानं दिग्दर्शित आणि 1999 मध्ये प्रदर्शित झालेला 'हम साथ-साथ हैं' या चित्रपटात फॅमिली ड्रामा पाहायला मिळाला. या चित्रपटात सलमान खान, सैफ अली खान आणि मोहनीश बहल यांनी भावांच्या भूमिका साकारल्या होत्या. तर त्यांच्यातील नात्यानं सगळ्यांची मने जिंकली होती. तर त्या तिघांना एक बहीण दाखवली असून नीलम कोठारीनं ती भूमिका साकारली होती. त्या बहिणीसाठी ते सगळं काही करताना दिसतात. 

5/8

2000 मध्ये हृतिक रोशन आणि करिश्मा कपूर यांचा 'फिजा' हा चित्रपट आला होता. हा चित्रपट देखील भावा-बहिणीच्या नात्यावर आधारीत आहे. त्या दोघांनी उत्तम अभिनय करत सगळ्यांची मने जिंकली होती. भावा-बहिणीचं एकमेकांवर असलेलं प्रेम आणि संघर्ष यात दाखवण्यात आला आहे. 

6/8

1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बंधन' या चित्रपटाला प्रेक्षकांनी जवळून पाहिलं आहे. हा चित्रपट तुम्हाला हसवेल आणि रडवेल. सलमान खाननं यात अश्विनी भावेच्या भावाची भूमिका साकारली आहे. 

7/8

2016 मध्ये प्रदर्शित झालेला 'सरबजीत' या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि ऐश्वर्या रायनं भावा-बहिणीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट खऱ्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटाची पटकथा ही खूप भावूक करणारी आहे. 

8/8

2015 मध्ये प्रदर्शित झालेला 'दिल धडकने दो' या चित्रपटात रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रानं भावा-बहिणीची भूमिका साकरली होती. त्यांच्यातील सुंदर बॉन्डिंग पाहायला मिळते.