Waterfall Picnic Spot : पावसाळा आला! 'या' धबधब्यांना पर्यटकांची पसंती, एकदा नक्की भेट द्या

Waterfall Picnic Spot In Maharashtra : जून महिना संपताच उष्णतेची लाट कमी होऊन हलक्या पावसाच्या सरी बरसू लागतात. सगळीकडे हिरवळ, मातीचा वास, वातावरणात पसरलेला गारवा, कोसळणाऱ्या सरी आणि बेधूंद करणारा मातीचा सुवास आपल्याला सर्वत्र जाणवू लागतो.  

Jun 27, 2023, 15:31 PM IST
1/7

Waterfall Picnic Spot

पावसाळा सुरु झाला की उंच उंच डोंगरावरून धबधबे आणि कोसळणाऱ्या पावसाच्या धारा अंगावर घेण्यासाठी सगळ्यांची रेलचेल सुरु होते. अशीच काही ठिकाणे आहेत जी तुम्ही सुट्टीच्या काळात आनंदात घालवू शकतात.   

2/7

Waterfall Picnic Spot

देवकुंड हे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आहे. भिरा गावात पोहोचल्यावर दीड ते दोन तासांच्या ट्रेक करून मग देवकुंड धबधब्यावर पोहचता येते. हे मुंबईपासून 125 किलोमीटर अंतरावर आहे. देवकुंड धाब्याला ताम्हिणी घाट असेही म्हणतात. येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. 

3/7

Waterfall Picnic Spot

दाभोसा आणि हिरडपाडा ही पालघरमधील जव्हार या ठिकाणे आहेत. डोंगराच्या कुशीत दाभोसा आणि हिरडपाडा ही ठिकाणे जव्हार तालुक्यापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहेत. या धबधब्याच खासियत म्हणजे हा धबधबा बारा महिने सुरु असल्याने पर्यटकांना या पर्यटन स्थळांचा आनंद घेता येतो.

4/7

Waterfall Picnic Spot

पांडवकडा हे खारघरमधील एक ठिकाण आह. मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे. कड्यावरुन कोसळणारे पाणी आणि कर्कश आवाज भीतीदायक वाटतं असतो.   

5/7

Waterfall Picnic Spot

बदलापूरमधील कोंडेश्वर हा धबडबा खूप प्रसिद्ध आहे. बदलापूर स्टेशन 5-6 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण घनदाट जंगलाच्या मधोमध आहे. सभोवतालचा परिसर अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे.  

6/7

Waterfall Picnic Spot

माळशेज धबधबा हे पावसाळी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. कल्याण रेल्वे स्थानक ते माळशेज घाट हे अंतर सुमारे 85 किमी आहे. पावसाळ्यात दाट धुक्याची शाल पांघरलेला हा डोंगर दऱ्याचा परिसर पर्यटकांना वेड लावतो.  

7/7

Waterfall Picnic Spot

जुम्मापट्टी हे नेरळ आणि माथेरानमधील ठिकाण आहे. हा धबधबा मुंबईपासून अवघ्या दोन तासांवर अहे. पावसाळा सुरु झाला की आठ दिवसांत हा धबधबा वाहू लागतो. इथे लोकांची मोठी गर्दी होते.