IPL 2023 : एकाच डावात 17 षटकार... राजस्थानला दणका देणारा प्रभसिमरन सिंग कोण आहे?

Prabhsimran Singh : आयपीएल (IPL) ही स्पर्धा दरवर्षी भारतीय क्रिकेटला नवीन दमदार खेळाडूंची देण देत असते. यंदाही आयपीएलने असेच काहीसे प्रतिभावान खेळाडू दिले आहेत. त्यातच एक नाव आहे ते म्हणजे प्रभसिमरन सिंग आहे. बुधवारी प्रभसिमरन सिंगने राजस्थानच्या (RR) गोलंदाजांना रडवले होते.

Apr 07, 2023, 16:22 PM IST
1/7

 opening batter Prabhsimran Singh

वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केलेल्या प्रभसिमरने पंजाबच्या संघासाठी खूप धावा केल्या. पंजाब अंडर-23 स्पर्धेत त्याने 298 धावा करून आपली क्षमता दाखवली अन् त्यानंतर त्याची अंडर-19 आशिया कप संघात निवड झाली होती. (फोटो - AP) 

2/7

Prabhasimran was bought by Punjab Kings in the 2019 IPL auction

2019 च्या आयपीएल लिलावात प्रभसिमरनला पंजाब किंग्जने 4.8 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही त्याच्यासाठी बोली लावली होती.

3/7

Cricketer prabhsimran singh

प्रभसिमरन सिंगचे काका सतविंदर सिंग हे भारतीय संघासाठी हँडबॉल खेळले आहेत. सतविंदर यांना आपल्या मुलाने आणि पुतण्याने हँडबॉलचा वारसा पुढे चालवावा अशी इच्छा होती. मात्र नशिबाने काही वेळगेच लिहून ठेवले असल्याने दोघेही क्रिकेटपटू झाले. (फोटो - @prabhsimran01)

4/7

Punjab kings

आयपीएल 2023 च्या मिनी-ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सने मयंकअग्रवालला करारमुक्त केल्यानंतर ओपनिंगसाठी कोण येणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी प्रभसिमरनला संधी मिळाली अन् त्याने पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 23 धावा करून स्वतःला सिद्ध केले. (फोटो - BCCI/IPL)

5/7

prabhsimran singh vs RR

बुधवारी देखील राजस्थानविरुद्धच्या सामन्यात प्रभसिमरने तुफानी फलंदाजी केली. प्रभसिमरनने 34 चेंडूत 60 धावा करत राजस्थानला दणका दिला. कर्णधार शिखर धवनच्या साथीने प्रभसिमरनने नऊ षटकांत 90 धावा केल्या. प्रभासिमरनने आपल्या खेळीत सात चौकार आणि तीन षटकार मारले.

6/7

prabhsimran singh Kings 11 punjab

प्रभसिमरने त्याच्या T20 स्पर्धेच्या कारर्किदीत 41 डावात 36.84 च्या सरासरीने 1179 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 140 च्या आसपास होता. (फोटो - PTI)

7/7

prabhsimran singh record

दरम्यान, IPL 2023 ची तयारी करत असताना प्रभासिमरनने एका सामन्यात 17 षटकार ठोकले होते. प्रभासिमरन डीवाय पाटील टी-20 चषकात कॅगकडून खेळत होता. आयकर विभागविरुद्ध खेळताना त्याने 55 चेंडूत 17 षटकारांसह 161 धावा केल्या होत्या. (फोटो - KXIP)