Weekly Money Horoscope : शुक्र आणि बुध गोचरमुळे 'या' राशी होणार श्रीमंत, तुमच्यासाठी कसा आहे हा आठवडा?

Weekly Money Horoscope 03 to 09 July 2023 : जुलैच्या पहिला आठवडा हा अनेक राशींच्या आयुष्यात धनलाभ घेऊन आला आहे. तुमच्या नशिबात धनलाभ आहे का जाणून घ्या. 

| Jul 02, 2023, 23:45 PM IST

Weekly Money Horoscope 03 to 09 July 2023 : जुलैच्या पहिल्या आठवड्यात शुक्र गोचर आणि बुध गोचर असल्याने 12 राशीच्या लोकांवर याचा परिणाम दिसून येणार आहे. 

 

1/13

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

धनाचा कारक शुक्र सिंह राशीत तर ग्रहांचा राजकुमार बुध कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे आर्थिक फायदा आणि करिअरमध्ये प्रगतीचे योग घेऊन आला आहे. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून घ्या. 

2/13

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीच्या दृष्टिकोनातून उत्तम आहे. व्यावसायिकांनी हाती घेतलेले प्रकल्प वेळ पूर्ण होतील. जोडीदारासोबतचं नातं मजबूत होईल. बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. आरोग्याची काळजी घ्या जुन्या समस्या उध्द्भवू शकतात. कुटुंबात आनंददायी वातावरण असणार आहे. या आठड्यात प्रवास टाळणे योग ठरेल.

3/13

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून या आठवड्यात तुम्हाला फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रातही वातावरण सकारात्मक असणार आहे. प्रेम जीवनात रोमान्सची एन्ट्री होणार असल्याने तुम्ही आनंदी असणार आहात. कुटुंबात शुभ कार्य ठरणार आहे. निर्णय घेताना मनात गोंधळ उडणार आहे. घरातील ज्येष्ठ महिलांची प्रकृतीचा ढासळणार आहे. आठवड्याचा शेवटी वादविवाद टाळा. 

4/13

मिथुन (Gemini)

हा आठवडा मिथुन राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. प्रगतीमध्ये यश आणि संपत्ती वाढणार आहे. त्यामुळे तुमची तिजोरी भरणार आहे. आरोग्याची समस्या दूर होणार आहे. लव्ह लाइफमध्ये सकारात्मक घटना घडणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढून नातं मजूबत होणार आहे. प्रवासातून फायदा होणार आहे. आठवड्याच्या शेवटी जरा मानसिक त्रास होऊ शकतो. 

5/13

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिकबाबीत थोडं लक्ष देण्याची गरज आहे. मात्र करिअरच्या बाबतीत हा आठवड्यात तुमची प्रगती होणार आहे. कुटुंबासोबत आनंदी क्षण व्यतित करणार आहात. हा आठवड्यात तुम्ही आरोग्याकडे विशेष लक्ष देणार आहात. लव्ह लाइफचं बोलायचं झालं तर तुम्हाला एकटेपणाची भावना येऊ शकतं. आठवड्याच्या शेवटी सुख समृद्धी तुमच्या दारात नांदणार आहे. 

6/13

सिंह (Leo)

हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी प्रगती घेऊन आला आहे. समाजात मान सन्मानासोबत आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे. व्यावसायिकांना करार आणि प्रकल्पातून फायदा होणार आहे. प्रवास करताना सावध राहा, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. या आठवड्यात तुमच्या अधिक खर्च होणार आहे. घरातील ज्येष्ठांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. 

7/13

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक फायदा होणार आहे. धनलाभाचे अनेक मार्ग खुले होणार आहेत. करिअरच्या दृष्टीकोनातून तुम्ही प्रगतीकडे वाटचाल असणार आहे. जोडीदारासोबत उत्तम काळ व्यतित करणार आहे, त्यामुळे तुमचं नातं मजबूत करणारं ठरणार आहे. कामानिमित्त प्रवास घडणार आहे. आरोग्याची समस्या त्रासदायक ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जरा एकटेपणा जाणवेल. 

8/13

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या लाभदायक राहणार आहे. गुंतवणुकीसाठी हा आठवडा उत्तम आहे. जुन्या आजार बरा होत असल्याने तुमचं मनं प्रसन्न राहिल. कार्यक्षेत्रात मात्र कुठल्या तरी बातमीने मनं उदास होईल. कामाच्या निमित्त होणाऱ्या प्रवासातून फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये जोडीदाराकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकतं.   

9/13

वृश्चिक (Scorpio)

हा आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगती घेऊन आला आहे. तुम्हाला अनेक चांगल्या बातम्या मिळणार आहेत. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत. या आठवड्यात तुमचं आरोग्यही चांगलं राहणार आहे. कुटुंबातील सदस्यामुळे तुम्ही चिंतेत असणार आहात. लव्ह लाइफमध्ये सुद्धा चढ उतार असणार आहेत. 

10/13

धनु (Sagittarius)

हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी धनलाभ घेऊन आला आहे. अनेक ठिकाणाहून अचानक आर्थिक फायदा होणार आहे. नवीन गुंतवणुकीसाठी बेस्ट आठवडा आहे. मात्र कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. प्रेम जीवनात निराशा येईल आणि मन उदास राहिल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एकटं वाटू शकतं. 

11/13

मकर (Capricorn)

हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी प्रगती घेऊन आला आहे. प्रत्येक कामात त्यांना यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. या आठवड्यात कायम बॅकअप प्लॅन तयार ठेवा. कामानिमित्त प्रवासाला जावं लागणार आहे. या प्रवासातून काही अचडणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात कुठल्या तरी कारणामुळे मनं उदास होऊ शकतं. देव धर्मात मनं रमवल्यास आठवड्याच्या शेवटी तुम्हाला प्रसन्न वाटेल. 

12/13

कुंभ (Aquarius)

हा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी सर्वात उत्तम ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती आणि यश तुमचं स्वागत करणार आहे. बँक बॅलेन्स वाढणार आहे. गुंतवणुकीतून तुमच्या फायदा होणार आहे. लव्ह लाइफमध्ये उत्साह येणार असून नवीन सुरुवात करणार आहात. मुलांशी संबंधित आनंदाची बातमी मिळणार आहे. मात्र या आठवड्यात कामानिमित्त बाहेर जाणं टाळा. 

13/13

मीन (Pisces)

हा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी संमिश्र असणार आहे. आर्थिक प्रगतीसाठी मात्र जास्त मेहनत करावी लागणार आहे. लव्ह लाइफमध्ये गोड कडू अनुभव येणार आहे. कार्यक्षेत्रात अहंकार बाजूला ठेवा अन्यथा मोठा फटका बसेल. एखाद्या महिलेमुळे आयुष्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)