Weekly Money Horoscope : 'या' 5 राशींच्या नशिबात पैसाच पैसा, हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील?

Weekly Money Horoscope 12 to 18 June 2023 : पाहता पाहता जूनचा तिसरा आठवडा 5 राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. जाणून घ्या तुमच्यासाठी हा आठवडा कसा असेल. 

Jun 11, 2023, 09:36 AM IST

Weekly Money Horoscope 12 to 18 June 2023 : या आठवड्यात सूर्याचं गोचर आणि शनीची उलटी चाल काही राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे. काही राशींना आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत.  (weekly money horoscope 12 to 18 June 2023 lucky zodiac signs get money success and increment arthik rashi bhavishya in marathi)

1/13

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

मेष पासून मीन राशीपर्यंत सर्वांसाठी हा आठवडा पैसा आणि धनाच्या बाबतीत कसा असेल जाणून घेऊयात.

2/13

मेष (Aries)

हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. धनलाभाचे शुभ योग या आठवड्यात जुळून आले आहेत. कार्यक्षेत्रातही उत्तम संधी मिळणार आहे. मेसेज पाठवताना काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी आनंदाची बातमी मिळणार आहे. बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तो सध्या टाळा. 

3/13

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअरच्या दृष्टीने उत्तम असणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. या आठवड्यात खर्चही अधिक होणार आहे. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. प्रवास करु नका. कुटुंबातील वाद बोलून सोडवा. 

4/13

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या संमिश्र असणार आहे. जीवनात समतोल राखून पुढे गेल्यास फायदा होईल. कार्यक्षेत्राच्या ठिकाणी बाह्य हस्तक्षेप तुम्हाला विचलित करतील. या आठवड्यात तुमचा खर्चही वाढणार आहे. 

5/13

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणार आहे. धनलाभाचे योग आहेत. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे. आरोग्यात सुधारणा होणार आहे. कुटुंबातून आनंदाची बातमी मिळणार आहे.  त्यामुळे मन प्रसन्न राहिल. 

6/13

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी फायदे होतील. आरोग्याबद्दल चिंता मिटणार आहे. नवीन प्रकल्पामुळे आर्थिक फायदा होणार आहे. प्रवास टाळा. 

7/13

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक लाभाचा ठरणार आहे. प्रवासातून अचानक धनलाभ आहे. कामाच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळणार आहे. कुटुंबात सुख समृद्धी नांदणार आहे. आठवड्याच्या शेवटी शुभ योग जुळून येणार आहे. 

8/13

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या यशस्वी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात कामातून यश मिळणार आहे. वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करेल. गुंतवणुकीतून भविष्यात फायदा होणार आहे. आठवड्याच्या शेवटी धनलाभ आहे. 

9/13

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या संमिश्र असणार आहे. भागीदारीमध्ये केलेले काम फायदेशीर ठरेल. मात्र काही वेळा मानसिक त्रासाला समोर जावे लागेल. हा आठवडा तुम्हाला खर्चिक ठरणार आहे. गुंतवणूक विचारपूर्वक करा. प्रवास टाळलेलाच बरा राहिल. 

10/13

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यश घेऊ आला आहे. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात अचानक धनलाभाचे योग आहेत. गुंतवणुकीतून फायदा मिळेल. जोडीदारासोबत आर्थिक व्यवहाराचे विचार कराल. 

11/13

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्टीकोनातून भाग्यशाली ठरणार आहे. गुंतवणुकीतून चांगले परिणार दिसून येणार आहे. धनलाभाचे सुंदर योग जुळून आले आहेत. कोर्टकचेरीचे प्रकरण त्रासदायक ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी सगळं मनासारखं होणार आहे. 

12/13

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणार आहे. कुठलाही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. प्रवास टाळलेलाच बरा राहिल. आठवड्याच्या शेवटी आनंदाचे क्षण तुमच्या दारावर येणार आहेत. 

13/13

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खर्चिक ठरणार आहे. गुंतवणुकीकडे लक्ष द्या. कुटुंबात आर्थिकबाबीतून मतभेद होणार आहे. कार्यक्षेत्रात मात्र प्रगतीचे योग आहेत. आठवड्याच्या शेवटी मन प्रसन्न होईल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)