Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांनी वाद विवाद टाळावा! तुमच्यासाठी कसा असेल जुलैचा शेवटचा आठवडा?
Saptahik Ank jyotish 22 to 28 July 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 22 ते 28 जुलैपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
नेहा चौधरी
| Jul 21, 2024, 16:42 PM IST
1/9
मूलांक 1
![मूलांक 1](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/21/769212-mulank1.png)
2/9
मूलांक 2
![मूलांक 2](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/21/769211-mulank2.png)
या आठवड्यात कार्यक्षेत्रात हळूहळू प्रगतीच्या संधी मिळणार आहे. प्रकल्प यशाच्या मार्गावर वाटचाल करणार आहे. तुम्हाला आर्थिक बाबतीत थोडे निर्बंध येऊ शकतात. खुलेपणाने गुंतवणूक करणे टाळा. प्रेमसंबंधात थोडीशी जोखीम पत्करून निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही जितके अधिक लक्ष केंद्रित कराल, तेवढं तुमच्या हिताच ठरेल.
3/9
मूलांक 3
![मूलांक 3](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/21/769210-mulank3.png)
आर्थिक बाबतीत काळ अनुकूल असून आर्थिक लाभासाठी मजबूत स्थिती असणार आहे. भागीदारीत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येणार आहे. कामाच्या ठिकाणी संयमाने निर्णय घेतल्यास बरं होईल. प्रेमसंबंधात परस्पर प्रेम तेव्हाच वाढेल जेव्हा तुम्ही हट्टीपणा सोडून संवादाने साधाल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत आनंददायी वेळ व्यतित करणार आहात.
4/9
मूलांक 4
![मूलांक 4](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/21/769209-mulank4.png)
5/9
मूलांक 5
![मूलांक 5](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/21/769207-mulank5.png)
6/9
मूलांक 6
![मूलांक 6](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/21/769206-mulank6.png)
तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. न्यायालयीन प्रकरणे तुमच्या बाजूने लागणार आहेत. प्रेमसंबंधांमध्येही परस्पर प्रेमात हळूहळू सुधारणा आहेत. बहुआयामी दृष्टीकोनातून परिस्थितीचे आकलन करून निर्णय घेतल्यास, प्रेम जीवनात सुखद अनुभव येणार आहे. आर्थिक खर्च जास्त होणार आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आठवड्याच्या शेवटी भागीदारीत केलेले काम तुमच्यासाठी शुभ असणार आहेत. तुम्ही लग्न समारंभालाही उपस्थित राहणार आहात.
7/9
मूलांक 7
![मूलांक 7](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/21/769205-mulank7.png)
आर्थिक बाबींसाठी हा आठवडा शुभ असून आर्थिक लाभ होणार आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवा. प्रेमसंबंधातील काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणीही हवे तसे बदल दिसणार नाहीत. ते मिळविण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. सप्ताहाच्या शेवटी जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडणार आहे.
8/9
मूलांक 8
![मूलांक 8](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/21/769204-mulank8.png)
कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. झटपट निर्णय घेण्याची तुमची क्षमता तुमच्यासाठी शुभ परिणाम देणार आहे. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक केलेली गुंतवणूक तुम्हाला संपत्ती मिळवण्याच्या संधी निर्माण करणार आहे. प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम दृढ होणार आहे. हळूहळू परिस्थिती तुमच्या अनुकूल असणार आहे. आठवड्याच्या शेवटी आनंद आणि समृद्धी असणार आहे. आठवड्याच्या शेवटी केलेला कोणताही प्रवास यशाचा मार्ग मोकळा करणारा असणार आहे.
9/9
मूलांक 9
![मूलांक 9](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/21/769203-mulank9.png)