Weekly Numerology : 'या' मूलांक क्रमांकांसाठी हा आठवडा ठरणार लकी! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 25 to 31 march 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 25 मार्च ते 31 मार्च हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Mar 25, 2024, 18:59 PM IST
1/10

Weekly Numerology 25 to 31 march 2024

अंकशास्त्रानुसार तुमची जन्मतारीखपासून तयार होणारा मूलांक आणि ग्रहांची स्थिती पाहून त्या व्यक्तीसाठी मार्चच्या शेवटचा आठवड्या कसा असेल तर कामाच्या ठिकाणी काय उतार चढाव असेल? याबद्दल 1 ते 9 अंक असलेल्या सर्व लोकांसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक अंकशास्त्र

2/10

मूलांक 1

मार्चच्या हा शेवटचा आठवड्या अंक 1 असलेल्या लोकांसाठी चांगला असणार आहे. या लोकांची प्रगती होणार आहे. भागीदारीत केलेली कामं तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे. आर्थिक बाबतीत अचानक अडचणीत सापडणार आहात. मालमत्ता खरेदी करताना लक्षपूर्वक काळजी घ्या. लव्ह लाइफमध्ये एकटेपणा वाटेल.   

3/10

मूलांक 2

मूलांक 2 असलेल्या लोकांंसाठी हा आठवडा सकारात्मक असणार आहे. प्रगती, सुख आणि समृद्धीने हा आठवडा आनंदाने भरलेला असेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याचीही काळजी घ्या. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचं नात्यात चढ उतार येणार आहे. आठवड्याचा शेवट थोडा गोड होईल.   

4/10

मूलांक 3

आर्थिक बाबतीत, मार्चचा हा आठवडा क्रमांक 3 असलेल्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करावी लागणार आहे. कोणताही निर्णय आत्मविश्वासाने घेतल्यास तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी कानावर वाईट वाटणार आहे. 

5/10

मूलांक 4

या लोकांचे रखडलेले कामं पूर्ण होणार आहे. पालकांशी नातेसंबंध चांगले होणार आहेत. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी यश मिळणार आहे. नवीन गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. आठवड्याच्या शेवटी तणाव वाढणार आहे. तुम्हाला झोपेचा त्रास होण्याची शक्यता आहे.     

6/10

मूलांक 5

या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. आत्मविश्वासाने निर्णय घेतल्याने प्रकल्पाने यशस्वी होणार आहात. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. लव्ह लाईफमध्ये काही गैरसमजामुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती थोडी सुधारेल. 

7/10

मूलांक 6

मार्चच्या हा आठवड्यात मूलांक 6 चांगला असणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी शुभ आठवडा आहे. नोकरदार असो किंवा व्यावसायिकांना या आठवड्यात यश मिळणार आहे. आर्थिक लाभही होणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ भविष्यात मिळणार आहे.   

8/10

मूलांक 7

या नंबरच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक लाभाचा असणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा झाला आहे. पैसे कमवण्याचे नवीन मार्गही तुम्हाला मिळणार आहे. जोडीदारासोबतचे संबंध सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.   

9/10

मूलांक 8

8 क्रमांक असलेले लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. चौकटी बाहेरचा विचार आणि तुमचा आत्मविश्वास तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. आर्थिक बाबतीत आत्मविश्वासाने निर्णय घ्या. लव्ह लाइफमध्ये अडचणी येईल.   

10/10

मूलांक 9

या लोकांसाठी हा आठवडा यशाचा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती तुमची वाट पाहत आहे. वैवाहिक जीवनात सुख आणि आनंद असणार आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)