देशातील सर्वात श्रीमंत मुख्यंमत्री कोण? 30 पैकी 29 मुख्यमंत्री करोडपती, जाणून घ्या लिस्ट

Richest CM in India 2023: Association for Democratic Reforms ने देशातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली असून 30 पैकी 29 मुख्यमंत्री श्रीमंत आहेत. जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 11 व्या क्रमांकावर आहेत.   

Apr 13, 2023, 18:17 PM IST

 

 

1/7

Richest CM in India 2023

Richest CM in India 2023: असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (Association for Democratic Reforms) देशातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. ADR ने निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या आधारे ही यादी जाहीर केली असून यामध्ये देशातील 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्याचा समावेश आहे.   

2/7

Jagmohan Reddy

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. 510 कोटींच्या संपत्तीसह या यादीत ते अग्रस्थानी आहेत.   

3/7

Jagmohan Reddy

46 वर्षीय मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे 510 कोटींहून अधिक संपत्ती आहे. त्यांचे स्वत:चे उत्पन्न 50 कोटींहून अधिक आहे  

4/7

Jagan Reddy

यादीनुसार 30 पैकी 29 मुख्यमंत्री करोडपती आहेत. जगन रेड्डी यांच्यानंतर श्रीमंतांच्या या यादीत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू (163 कोटी) आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक (63 कोटी) यांचा क्रमांक आहे.  

5/7

Mamta Banerjee

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या एकमेव करोडपती नसणाऱ्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांची संपत्ती एकूण 15 लाख इतकी आहे.   

6/7

Arvind Kejriwal

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रत्येकी 3 कोटींची संपत्ती आहे.   

7/7

Eknath Shinde

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे तब्बल 11 कोटींची संपत्ती आहे. त्यामुळे करोडपती मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे.