Phone Hang Problem : तुमचा मोबाईल वारंवार हँग होतोय? मग फॉलो करा 'या' टिप्स

Phone Hang Solution  :  दिवसेंदिवस स्मार्टफोनमध्ये नवीन प्रोसेसर आणि फीचर्ससह लॉन्च होत असतो. या 5.5 इंचाच्या या स्मार्टफोनमध्ये कित्येक गोष्टी समावलेला असतात. या स्मार्टफोनमुळे आपल्या कित्येक गोष्टी सोप्या होऊन जातात. मात्र या स्मार्टफोनचा आपल्याकडून अनेकदा अति वापर केला जातो. त्यामुळे फोन हँग होण्याची समस्या जास्त सतावत असते. स्मार्टफोनबाबत तर ही समस्या जास्त उद्भवते. अशावेळी नेमके काय करावे त्याबद्दल जाणून घ्या...   

Apr 13, 2023, 13:46 PM IST
1/6

स्मार्टफोन हा अॅप्स, अनावश्यक फाइल्स, फोटो आणि डेटाने भरलेला असतो. जर तुमच्या फोनमधील डेटा जास्त प्रमाणात झाला की मोबाईल हँग होऊ लागतो. अशावेळी तुमच्या मोबाईल स्टोरेजमधील डेटा मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर करुन घ्या. असे केल्याने तुमचा फोन हँग होणार नाही. 

2/6

फोनमधून अनावश्यक अॅप्स तात्पुरते अनइंस्टॉल करा. जेव्हा गरजेचे असेल तेव्हा पुन्हा इंस्टॉल करु शकता. 

3/6

तसेच फोनमध्ये फोटो सेव्ह करताना 'गुगल ड्राइव्ह' किंवा 'क्लाउड'मध्ये सेव्ह करा. यामुळे फोन मेमरी फोटोंनी भरणार नाही. आणि तुमचा फोन देखील हँग होणार नाही.

4/6

तुम्ही प्रत्येक वेळी डाउनलोड केलेला डेटा नेहमी उपयुक्त किंवा पुन्हा वापरता येणार नाही. काम झाल्यानंतर डाउनलोड डेटा डिलीट करुन टाका. 

5/6

 जेव्हा स्मार्टफोन खूप हँग होऊ लागतो, तेव्हा तुम्ही मोबाईल रीस्टार्ट देखील करू शकता. रीस्टार्ट करणे म्हणजे तुमचा स्मार्टफोन एकदा वापरण्यासाठी तयार आहे. यासोबतच तुम्हाला उत्तम स्पीडही मिळेल. 

6/6

कोणत्याही स्मार्टफोनचा वेग चांगला असण्यासाठी त्याची रॅमही चांगली असने गरजेचे आहे. चांगली रॅम आणि कमी अॅप्समुळे तुमच्या स्मार्टफोनचा स्पीड खूप चांगला राहतो. फोन RAM पेक्षा जास्त अपलोड करू नका.