मृत्यू जवळ आल्यानंतर काय असतात लोकांच्या इच्छा? संशोधनातून झाला खुलासा

मृत्यूनंतर काय होते हे जिवंत असताना कोणालाही कळू शकत नाही. परंतु लोकांच्या शेवटच्या क्षणी काय होतं याबद्दल खुलासा झाला आहे. स्टॅफोर्डशायर, इंग्लंडमध्ये काम करणाऱ्या नर्सने याबाबत माहिती दिलीये. 

Apr 09, 2024, 08:30 AM IST

मृत्यूनंतर काय होते हे जिवंत असताना कोणालाही कळू शकत नाही. परंतु लोकांच्या शेवटच्या क्षणी काय होतं याबद्दल खुलासा झाला आहे. स्टॅफोर्डशायर, इंग्लंडमध्ये काम करणाऱ्या नर्सने याबाबत माहिती दिलीये. 

1/7

या नर्सने जगातून निघून गेलेल्यां व्यक्तींना शेवटच्या क्षणी खूप जवळून पाहिलं होतं. 

2/7

नर्सच्या म्हणण्याप्रमाणे, मृत्यूच्या समीप असलेल्या काही रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण होतं. तर काहींच्या आयुष्यातील चुका त्यांच्या आठवत होत्या.

3/7

नर्स म्हणाल्या की, शेवटच्या क्षणी, रुग्ण अनेकदा पाळीव प्राण्यांना बघण्याची इच्छा बोलून दाखवतात. तर काहीजण चहाचा प्यायची इच्छा धरतात. 

4/7

एकदा आजारी जोडप्याने बेड एकमेकांच्या जवळ ठेवण्याची विनंती केली होती. ज्यामुळे ते शेवटच्या क्षणीही एकमेकांचे हात धरू शकतील.

5/7

बहुतेक मरणासन्न लोकं तक्रार करतात की, आयुष्य खूप लहान आहे आणि त्यांना त्यांचं निवृत्तीनंतरचं आयुष्य चांगले जगता आले नाही याची खंत होती.  

6/7

नॉर्थ कॅरोलिनामध्ये केलेल्या संशोधनात असं आढळून आलेलं की, असे रुग्ण आशावादी असतात. 

7/7

नर्सना वाटतं की, लोकांनी मृत्यूवर खुलेपणाने चर्चा करावी आणि त्यांनी त्यासाठी तयारही राहावे. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती देण्यात आलेल्या संशोधनात आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)