राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कांतारातील 'भूत कोला' परंपरा नेमकी काय?

2022 मध्ये प्रदर्शित झालेला कांतारा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.कन्नड सिनेमासृष्टीतील कांतारा चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषी शेट्टींनी केले. यामध्ये कांतारा नावाची वनवासी लोकांच्या जमिनी सरकारव्दारे बळकावल्या जातात. 

Aug 16, 2024, 16:45 PM IST
1/5

हा केवळ चित्रपट नसून यामध्ये लाखो वनवासी समाजाच्या संस्कृतीची आणि इतिहासाची गोष्ट सांगण्यात आली आहे.यामध्ये भूत कोला ही परंपरा दाखवण्यात आली आहे. तुम्हाला माहित आहे का ही परंपरा नेमकी काय आहे ? सविस्तर जाणून घ्या...

2/5

भूत कोला ही स्थानिक पूजा आहे. जी मुळात ग्रामदेवताच्या मंदिराजळ केली जाते.. असं मानलं जातं की भूत कोला जे नृत्य करतो तेव्हा पंजुरी देवता येते आणि गावकऱ्यांचे कौंटुंबिक प्रश्न आणि समस्या सोडवते.

3/5

500 वर्षांपासून  ही परंपरा चालत आलेली आहे. तुळ परंपरेत भूत हा शब्द देवतेच्या बरोबरोचा मानला जातो आणि कोला म्हणजे कामगिरी. वनवासी समाजाच्या लोकांच्या जमिनींचे आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी ही परंपरा चालत आली आहे.   

4/5

मंगळुरू आणि कर्नाटकातील ग्रामस्था आणि त्यांच्या पूर्वजांचा असा विश्वास आहे की काही देवता अजूनही त्यांच्या भूमीचे रक्षण करतात आणि दैनंदिन व्यवहार पाहतात.   

5/5

भूत कोला या परंपरेमध्ये एक व्यक्ती नर्तक बनतो, त्यानंतर त्याचा मुलगा आणि नंतर त्याचा मुलगा नर्तक बनतो.  कर्नाटकात दरवर्षा भूत कोला आयोजित केला जातो. तर या परंपरेमध्ये कोलाद्वारे सांगितलेलं विधान सर्वोत्कृष्ट मानलं जातं आणि प्रत्येकाने त्याचे पालन करणे अनिवार्य असते.