PHOTO : 'चाहत्यांचे आभार...', हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटानंतर Natasa Stankovic ची नवी पोस्ट; म्हणाली, 'घाईमुळे आपण...'

Natasa Stankovic Insta Post : हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नताशापासून (Natasa Stankovic) हे घटस्फोट घेणार आहेत असे त्यांनी घोषित केलं. त्यानंतर हार्दिकचे ब्रिटीश गायिका जॅस्मीन वालियाला ग्रीसमध्ये फिरत आहे आणि ते डेट करत आहे, असं फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर नशाताने नवीन पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने चाहत्यांचे धन्यवाद मानले आहे. 

| Aug 16, 2024, 12:58 PM IST
1/7

गेल्या काही काळापासून नताशा आणि हार्दिक विभक्त होणार अशी चर्चा सुरु असताना दोघांनी सोशल मीडियावरुन आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचा जाहीर केलं. 

2/7

त्यानंतर नताशा (Natasa Stankovic) मुलगा अगस्त्यासोबत भारत सोडून आपल्या माहेरी सर्बियाला निघून गेली आहे. 

3/7

तिथे ती अगस्त्यासोबत कसा वेळ घालवतेय. त्याचा वाढदिवस तिने कसा साजरा केला असे अनेक क्षण ती व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

4/7

तिकडे हार्दिक पांड्या कथित गर्लफ्रेंड ब्रिटीश गायिका जॅस्मीन वालियाला (Jasmin Walia) डेट करत असून ते दोघे ग्रीसला एकत्र सुट्टी घालवत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

5/7

अशातच नताशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने चाहत्यांचे आभार मानले आहे. 

6/7

ती या व्हिडीओमध्ये म्हणतेय की, 'आपण गोष्टी इतक्या लवकर करण्याचा प्रयत्न करतो की आपल्याकडे वेळ नाही आहे. '

7/7

चाहत्यांचे आभार मानत अभिनेत्रीने पुढे म्हटलंय की, 'घाई करण्याचा नाद आपण देवाच्या आशीर्वादापासून वंचित राहतो.'