Sunetra Pawar wealth : सुनेत्रा पवार यांची एकूण संपत्ती किती? सुप्रिया सुळेंना दिलंय 35 लाखांचा कर्ज

Sunetra Pawar wealth : बारामती लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची संपत्ती किती? याची माहिती आता समोर आली आहे. त्याचबरोबर त्यांनी कोणाला किती कर्ज दिलंय? याबाबत देखील खुलासा झालाय.

| Apr 18, 2024, 20:21 PM IST

Baramati Candidate Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजयी अशी लढत बघायला मिळत आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमदेवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. त्यावेळी दोन्ही उमेदवारांच्या संपत्तीची माहिती समोर आलीये.

 

1/7

वैयक्तिक देणी कर्ज

सुनेत्रा पवार यांना वैयक्तिक देणी कर्ज एकूण 12 कोटी 11 लाख 12 हजार 374 रुपये आहे. तर येणी कर्ज 2 कोटी 31 लाख 2 हजार 181 आहे. यामध्ये यामध्ये अजित पवारांना 63 लाख 20 हजार 303 रुपये दिले आहेत. तर प्रतिभा पवार यांना 50 लाख रुपये दिलेत. 

2/7

आर्थिक उत्पन्न

त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांना 35 लाख दिल्याची नोंद देखील करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांची 2022-23 मधील आर्थिक उत्पन्न 4 कोटी 22 लाख 21 हजार 010 रुपये इतके आहे. 

3/7

जंगम मालमत्ता

यामध्ये त्यांची जंगम मालमत्ता 12 कोटी 56 लाख 58 हजार 983 रुपये एवढी आहे. तसेच स्थावर मालमत्ता 58 कोटी 39 लाख 40 हजार 751 रुपये आहे. 

4/7

शेअर बाजार आणि बॉन्ड

एवढंच नाही तर सुनेत्रा पवार यांनी 15 लाख 69 हजार 610 रुपयांची शेअर बाजार आणि बॉन्डमध्ये गुंतवणूक देखील केलीये. स्व संपादित मालमत्ता 18 कोटी 11 लाख 72 हजार 185 रुपये आणि बँक खात्यातील एकणू ठेवी 2 कोटी 97 लाख 76 हजार 180 आहे. 

5/7

एकूण कर्ज

तसेच 57 लाख 76 हजार 877 रुपयांचे बचत पत्रे आहेत. सुनेत्रा पवार यांनी 2 कोटी 31 लाख 2 हजार 181 रुपयांचं कर्ज दिलंय. तर 10 लाख 70 हजार रुपयांचे वाहने ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलर आहेत. 

6/7

डाग दागिणे

सुनेत्रा पवार यांच्याकडे  34 लाख 39 हजार 569 रुपयांचे डाग दागिणे आहेत. तसेच इतर मालमत्ता इतर मालमत्ता 6 कोटी 5 लाख 18 हजार 116 रुपये इतकी आहे.

7/7

35 लाखांचं कर्ज

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांना 35 लाखांचं कर्ज दिल्याची नोंद झाल्याने आता बारामतीमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.