काय आहे डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक? याचा नागरिकांना काय फायदा होणार?
माहिती संरक्षण विधेयकमुळे नागरीकांच्या डिजीटल डेटा चोरी तसेच गैरवापर करण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे. यामुळे डिजीटल फसवणुकीचे प्रकार कमी होतील.
Data protection Bill passed in Lok Sabha: लोकसभेत वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलंय. नागरिकांच्या डिजिटल माहितीचा गैरवापर केल्यास किंवा तिची गोपनीयता राखू न शकल्यास संबंधित संस्थेला 250 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आलीय.. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक मांडलं.