ट्रकच्या मागे 'Horn ok please' का लिहिलेलं असतं? कारण जाणून म्हणाल, असंही असतं होय!

Horn OK Please Behind Truck: मुळात रस्त्यांवरून वाहन चालवत असताना तुम्हाला स्वत:च्या वाहनांसोबतच वाहन नियमांची माहिती असणं फार गरजेचं असतं. या माहितीचा तुम्हाला बराच फायदाही होतो.   

Dec 19, 2023, 13:53 PM IST

Horn OK Please Behind Truck: जर तुम्हीही वाहन चालवणाऱ्यांपैकी असाल तर, काही गोष्टींबाबत तुम्हाला माहिती असणं अतीव महत्त्वाचं. 

 

1/7

हे ट्रक कायम लक्ष वेधतात

what is the reason writing Horn OK Please Behind the Truck

Horn OK Please Behind Truck: शहरातील एखाद्या रस्त्यावरून किंवा राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना आपल्याला अनेकदा ट्रक आणि ट्रेलर दिसतात. किंबहुना आपल्याला अनेक वाहनं दिसतात. पण, त्यातही हे ट्रकच लक्ष वेधतात. कारण, असतं ते म्हणते त्यांच्यावर लिहिण्यात आलेले शब्द.   

2/7

समोरून एखादा ट्रक जात असेल तर....

what is the reason writing Horn OK Please Behind the Truck

आपल्या वाहनाच्या समोरून एखादा ट्रक जात असेल किंवा रस्त्यावरून चालता चालता एखाद्या ट्रकवर नजर पडल्यास आपल्याला त्यांच्या मागच्या बाजूल लिहिण्यात आलेले शब्द स्पष्टपणे दिसतात. 

3/7

ट्रकवर सरसकट Horn OK Please लिहिलेलं दिसतं

what is the reason writing Horn OK Please Behind the Truck

'पंख होते तो उड आती रे', 'मेरे पियां गए रंगून', 'बुरी नजर वाले तेरा मुह काला' या आणि अशा ओळींशिवाय सर्वच ट्रकवर सरसकट Horn OK Please लिहिलेलं दिसतं.   

4/7

हे असंच चित्र आपण पाहत आलो

what is the reason writing Horn OK Please Behind the Truck

सर्वच ट्रकवर हे असे शब्द लिहिण्याचं प्रस्थ काही आजचं नाही. तर, कैक वर्षांपासून हे असंच चित्र आपण पाहत आलो आहोत. पण, त्यामागचा अर्थ तुम्ही जाणून घेण्याता प्रयत्न कधी केला आहे का?

5/7

एक खास कारण

what is the reason writing Horn OK Please Behind the Truck

ट्रक किंवा ट्रॉली/ ट्रेलरच्या मागे Hork Ok Please लिहिण्यामागे एक खास कारण आहे. या वाक्याचा अर्थ महत्त्वाचा असून तो सर्वच वाहन चालकांनी लक्षात ठेवणं त्यांच्या दृष्टीनं आणि ट्रक चालकांच्या दृष्टीनंही महत्त्वाचं आहे. 

6/7

Hork Ok Please चा अर्थ...

what is the reason writing Horn OK Please Behind the Truck

Hork Ok Please चा अर्थ होतो, जर तुम्ही ट्रकच्या मागं आहात आणि तुम्हाला ट्रकला ओव्हरटेक करायचंय तर हॉर्न नक्की वाजवा. Hork आणि Please च्या मध्ये असणाऱ्या ओकेचा ठराविक अर्थ नाही. पण, इथं वेगवेगळ्या कारणांनी त्याचा संदर्भ जोडला जातो. 

7/7

Ok म्हणजे ...

what is the reason writing Horn OK Please Behind the Truck

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी Ok म्हणजे On Kerosene असा अर्थ होता. तर, दुसरा अर्थ म्हणजे तुम्ही जेव्हा ट्रकला बाजूला होण्याचा इशारा देण्यासाठी हॉर्न वाजवता तेव्हा ट्रकही एका लाईटच्या माध्यमातून इशारा देतो आणि बाजूला होतो. या प्रक्रियेलाही OK म्हणून संबोधलं जातं. आहे की नाही हे कारण कमाल?