शौचाला गेल्यानंतर तुम्ही पण जोर लावत असाल तर सावधान! जिवावर बेतू शकतं

Heart Attack If You Push Too Hard to Poop : सामान्यपणे बद्धकोष्ठताचा उल्लेख लोकांकडून पोट साफ झालं नाही, पोट खराब आहे अशा शब्दांमध्ये केला जातो. मात्र दिर्घकाळासाठी बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या लोकांच्या मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. मूळव्याध, फिशर, हृदयविकाराचा झटका येणे, स्ट्रोक, मोठ्या आतड्यामध्ये ट्यूमर, मधूमेह, थायरॉइडसारख्या समस्यांचा धोका बद्धकोष्ठतेच्या समस्या असल्यास वाढवतो. मात्र बद्धकोष्ठतेची समस्या हृदयविराकासाठी आणि स्ट्रोकसाठी कशी कारणीभूत ठरते जाणून घेऊयात...

| Dec 19, 2023, 14:05 PM IST
1/11

Heart Attack If You Push Too Hard to Poop

हल्ली हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलं आहे. तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढल्याचं मागील काही वर्षांपासून दिसत आहे. हृदयविकाराचा झटका येण्याची अनेक कारणं असू शकतात.  

2/11

Heart Attack If You Push Too Hard to Poop

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल मात्र कॉन्स्टिपेशन सुद्धा हृदयविकारासाठी कारणीभूत ठरु शकतं. बद्धकोष्ठता ही फार सामान्य बाब आहे. बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्यांची संख्याही वाढलेली दिसत आहे. नियमितपणे शौचाला न होणं किंवा शौचाला गेल्यानंतर अधिक जोर लावणे यासारख्या गोष्टींमुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते. 

3/11

Heart Attack If You Push Too Hard to Poop

शरीरामधून मैला बाहेर टाकताना जोर लावल्यास छातीत दुखण्याची समस्या निर्माण होऊ शकते. यामधूनच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असं मुंबईमधील झायनोव्हा शाल्बी रुग्णालयातील लेप्रोस्कोपिक सर्जन असलेल्या डॉ. हेमंत पटेल यांनी सांगितलं.

4/11

Heart Attack If You Push Too Hard to Poop

बद्धकोष्ठता असेल तर शौचाला गेल्यानंतर मैला बाहेर टाकताना जोर लावावा लागतो. असा जोर लावताना शरीरामधील रक्तबादावर परिणाम होऊ शकतो. अगदी विचित्र स्थिती निर्माण झाल्यास रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. असं झाल्यास हृदयविराचा झटका येऊ शकतो किंवा स्ट्रोकचा धोका निर्माण होतो.  

5/11

Heart Attack If You Push Too Hard to Poop

अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की आतड्यांमधील मायक्रोबायोममध्ये बदल होतो आणि हृदयासंदर्भातील समस्या निर्माण होतात. यामध्ये एथेरोस्क्लेरोसिस, रक्तदाब आणि हृदयासंदर्भातील अन्य समस्या उद्भवू शकतात.

6/11

Heart Attack If You Push Too Hard to Poop

वयाबरोबर बद्धकोष्ठतेची समस्या अधिक गंभीर रुप धारण करते. मात्र बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्याला हृदयविकाराचा धोका असतो असं नाही. अगदी काही प्रकरणांमध्ये असं घडतं.

7/11

Heart Attack If You Push Too Hard to Poop

बद्धकोष्ठतेमुळे अॅसिडीक रिफ्लक्सेसला चालना देतो आणि छातीत दुखू शकतं. म्हणजेच यामुळे छातीत जळजळ होणे, पोटात गॅस जमा होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. मात्र यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही.

8/11

Heart Attack If You Push Too Hard to Poop

छातीत का दुखत आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांची मदत घेणं फायद्याचं ठरतं. बद्धकोष्ठतेला नियंत्रणात आणण्यासाठी वेळीच उपाय करणं गरजेचं असतं. शारीरिक तणाव आणि मानसिक तणाव बद्धकोष्ठतेला कारणीभूत ठरु शकतो. 

9/11

Heart Attack If You Push Too Hard to Poop

आठवड्यातून 3 पेक्षा कमी वेळा शौचाला होत असेल किंवा शौचाला गेल्यावर मैला बाहेर फेकताना त्रास होत असेल, फार कोरडी आणि कठोर शौचाला होत असेल तर हे बद्धकोष्ठतेचे संकेत आहेत. शौचाला गेल्यानंतर फार त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

10/11

Heart Attack If You Push Too Hard to Poop

बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ नये म्हणून नियमित व्यायाम करणं आवश्यक असतं. नियमितपणे चालणे, भरपूर भाज्या आणि फळं खाणं, जेवणात सॅलेडचा समावेश करणं यासारख्या गोष्टींच्या माध्यमातून बद्धकोष्ठतेचा त्रास आपण टाळू शकतो. तसेच दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.

11/11

Heart Attack If You Push Too Hard to Poop

ज्यांना मधुमेह किंवा थायरॉइडचा त्रास असेल त्यांनी बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास तातडीने इलाज करुन घ्यावा. शौचामधून रक्त पडत असेल तर शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते. वजनही कमी होऊ शकतं. आपल्या फॅमेली डॉक्टारांचा सल्ला घेणं कधीही फायद्याचं ठरतं.