WhatsApp चं नवं फिचर, लगेचच 'हे' चार नंबर सेव्ह करा, घरबसल्या बुक करता येईल vegetables, Cab!

WhatsApp Feature: आता तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे भाजी आणि कॅब बुक करू शकणार आहे. त्यासाठी काय करावे लागेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या...    

Nov 20, 2022, 11:55 AM IST

WhatsApp Cab Booking Feature: सोशल मीडिया कंपनी मेटाच्या (Meta) मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅप (WhatsApp) जगात सर्वाधिक वापरले जाते. आपल्या देशात देखील  WhatsApp युजर्सची संख्या कोट्यावधीमध्ये आहे आणि यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

1/5

व्हॉट्सअॅपवर AI चॅटबॉट

चॅटअसिस्टंटच्या मदतीने तुम्हाला व्हॉट्सअॅपवरच अनेक माहिती मिळेल. याशिवाय तुम्ही व्हॉट्सअॅपवरूनच भाज्या ऑर्डर करू शकता. यावर तुम्हाला फ्लाइट असिस्टंट देखील मिळेल. यासाठी तुम्हाला कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही.  

2/5

व्हॉट्सअॅपद्वारे किराणा मालाची ऑर्डर द्या

यासाठी तुम्हाला जिओमार्ट चॅटबॉटची मदत घ्यावी लागेल. तुम्ही भाज्या, दैनंदिन खाद्यपदार्थ, किराणा सामान आणि बरेच काही ऑर्डर करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये 7977079770 हा नंबर सेव्ह करावा लागेल आणि त्यावर Hi लिहून व्हॉट्सअॅप मेसेज पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला संपूर्ण कॅटलॉग दाखवला जाईल. तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्या कार्टमध्ये जोडा. यानंतर तुम्हाला कार्ट लिस्ट पाठवावी लागेल आणि डिलिव्हरीचा पत्ता टाकावा लागेल. यानंतर तुम्ही डिलिव्हरीवर पैसे देऊ शकता किंवा ऑनलाइन पेमेंट करू शकता.

3/5

कॅब बुक करा

कॅब बुक करण्यासाठी तुम्हाला 7292000002 नंबर सेव्ह करावा लागेल. यासह, तुम्ही थेट LotsApp वरूनच Uber कॅब बुक करू शकता. यावरही तुम्हाला हाय लिहून मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर उबर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. यानंतर, तुम्ही पिकअप आणि ड्रॉप-ऑफ लोकेशन टाकून उबेर बुक करू शकता.

4/5

ट्रेनमध्ये फूड डिलीवरी

जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्ही Zoop चा नंबर 7042062070 सेव्ह केला पाहिजे. तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअॅपद्वारे ट्रेनमध्ये तुमच्यासाठी जेवण ऑर्डर करू शकता. यासाठी तुम्हाला पीएनआर क्रमांक द्यावा लागेल. तुम्ही सूचीमधून रेस्टॉरंट निवडून जेवण ऑर्डर करू शकता.

5/5

व्हॉट्सअॅपवर फ्लाइट असिस्टंट

जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर फ्लाइटचे तपशील मिळवायचे असतील तर तुम्ही इंडिगोसाठी 7428081281 किंवा एअर इंडियासाठी 9154195505  नंबर सेव्ह करू शकता. या चॅट असिस्टंटसह तुम्ही फ्लाइट स्टेटस, वेब चेक-इन यासारख्या गोष्टी करू शकता.