अशी झाली सोनाली आणि कुणालची पहिली भेट?

सोनालीने कुणालसोबत केला साखरपुडा 

Dakshata Thasale | May 23, 2020, 15:29 PM IST

मुंबई : अप्सरा म्हणत जिने महाराष्ट्रातील प्रेक्षकांवर जादू केली त्या सोनाली कुलकर्णीने आपला साखरपुडा झाल्याची घोषणा केली. सोनालीने आपल्या वाढदिवसादिवशी १८ मे रोजी ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. लॉकडाऊनमध्ये सोनालीने साखरपुड्याची घोषणा केल्यामुळे साऱ्यांनाच प्रश्न पडला आहे. सोनालीने कधी, कुठे आणि कुणासोबत साखरपुडा केला. तर आम्ही सांगतोय सोनाली आणि कुणालची पहिली भेट कशी झाली? 

1/5

वाढदिवसादिवशी सोनालीने केली मोठी अनाऊन्समेंट

वाढदिवसादिवशी सोनालीने केली मोठी अनाऊन्समेंट

 'आमचा ०२.०२.२०२० ला साखरपुडा झाला, आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं... आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या...', अशा कॅप्शनसह तिनं हे फोटो पोस्ट केले. 

2/5

'अप्सरा' सोनालीच साखरपुडा झाला

'अप्सरा' सोनालीच साखरपुडा झाला

गेल्या अनेक दिवसांपासून सोनालीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. 'हिरकणी' सिनेमाच्या यशानंतर पुन्हा तिला याबाबत विचारणा झाली. मात्र सोनालीने ते गुपित ठेवून अखेर आपल्या वाढदिवसादिवशी चाहत्यांना खास सरप्राईज दिलं. सोनाली आणि कुणाल यांनी  ०२.०२.२०२० रोजी साखरपुडा अगदी खासगी पद्धतीने केला. हा साखरपुडा दुबईत कुणालच्या घरी झाला. 

3/5

कधी आणि कुठे पार पडला साखरपुडा?

कधी आणि कुठे पार पडला साखरपुडा?

सोनाली आणि कुणालला ०२.०२.२०२० ही तारीख महत्वाची होती. त्यामुळे त्यांनी याच दिवशी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. सोनाली दुबईतच होती. सोनालीचे आई-बाबा, भाऊ मुंबईतून आले आणि कुणालचे आई-बाबा लंडनहून आले. यांनी दुबईत अतिशय साधेपद्धतीने साखरपुडा केला. मराठमोळ्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. 

4/5

दुबईत का केला साखरपुडा?

दुबईत का केला साखरपुडा?

दुबईला मुंबई आणि लंडनहून जाण सोईस्कर असल्यामुळे सोनाली आणि कुणालने अगदी घरच्याच घरी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सोनाली आणि कुणाल त्यांच्या कुटुंबियांसोबत एक आठवडा घरीच होते. यावेळी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना समजून घेतलं. सोबत वेळ घालवला. तो वेळ सोनालीला त्यांच्यासोबतच घालवायचा होता. त्यामुळे सोनालीने कुठेही आपल्या साखरपुड्याची माहिती दिली नाही.

5/5

अशी झाली दोघांची भेट

अशी झाली दोघांची भेट

सोनाली आणि कुणाल हे दोघं एकमेकांना लंडनमध्ये भेटले. सोनाली त्यावेळी 'ती ऍण्ड ती' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान भेट झाली. सोनाली आणि कुणाल काही ओळखीच्या नातेवाईकांमार्फत भेटले. त्यानंतर दोघंही एकमेकांच्या संपर्कात राहीले. त्यानंतर कुणाल सोनालीला भेटायला भारतात आला. त्यानंतर सोनाली कुणालला भेटायला दुबईला गेली. त्यानंतर अनेक वेळा या दोघांच्या गाठीभेटी होतच गेल्या. या भेटींमध्ये जवळीक तर वाढलीच पण एकमेकांसोबत आपण संपूर्ण आयुष्य घालवू शकतो असा विश्वास दोघांना वाटला. मग त्यांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला.