जगातील असा एकमेव देश! ज्याने युद्धात आजपर्यंत एकही जवान गमावला नाही

Soldier Martyred in War : सध्या संपूर्ण जगावर युद्धाचं सावट आहे. एकीकडे युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाद तर दुसरीकडे इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष युद्धाचं कारण बनलाय.

| Sep 05, 2024, 19:23 PM IST
1/5

युद्ध नको

जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत असल्याने मोठ्या प्रमाणात जिवितहानी होत असल्याचं दिसतंय. मात्र, काही देशांनी कधीही युद्धचा पर्याय अवलंबला नाही.

2/5

एकही सैनिक गमावला नाही

तुम्हाला जगातील अशा देशाबद्दल माहितीये का? ज्या देशाच्या सैन्याचा एकही सैनिक आजपर्यंत युद्धात गमावला नाही. होय, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण असा एक देश अस्तित्वात आहे.

3/5

स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंड या देशाने आत्तापर्यंत एकही जवान गमावला नाही. स्वित्झर्लंडने कायम तटस्थत धोरणाचा अवलंब केला आहे. गेल्या 200 वर्षांपासून या देशाने आपलं तत्वाचं पालन केलंय.

4/5

तटस्थतेचं धोरण

1815 मध्ये व्हिएन्ना काँग्रेसनंतर स्वित्झर्लंडने 'तटस्थतेचं धोरण' स्वीकारलं होतं. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघर्षात किंवा युद्धात सहभागी न होण्याचे वचन आहे.

5/5

सार्वभौमत्वाचे रक्षण

देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हे स्विस लष्कराचे मुख्य उद्दिष्ट आहे. या सैनिकांना केवळ संरक्षणासाठी प्रशिक्षण दिलं जातं. याचा परिणाम म्हणजे स्विस सैनिकांना युद्धभूमीवर कधीही हौतात्म्य पत्करावं लागलं नाही.