कोणते ड्रायफ्रूट्स भिजवून खावे आणि कोणते न भिजवता? वाट्टेल तसे खाऊन मिळत नाही पोषण

ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घेऊया. 

Sep 04, 2024, 18:25 PM IST

Soaked or Raw Dry Fruits Which one is Good For Health : ड्रायफ्रूट्स हे प्रोटीन्सचे भंडार आहे. ड्रायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात पोषणतत्व असतं.  ड्रायफ्रूट्स खाणे उत्तम आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. मात्र,  ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य पद्धत माहिती असले पाहिजे.  कोणते ड्रायफ्रूट्स भिजवून खावे आणि कोणते न भिजवता खावेत हे जाणून घेणे फारच गरजेचे आहे. कारण  वाट्टेल तसे ड्रायफ्रूट्स खाऊन पोषण मिळत नाही. 

1/7

 ड्रायफ्रूट्स हे पोषक तत्वांचे पॉवर हाऊस आहे. ड्रायफ्रुट्सचे नियमित सेवन केल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होते. भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाणे अधिक फायदेशीर आहे. मात्र, काही ड्रायफ्रुट्स हे भिजवता खाणे फायदेशीर ठरते. 

2/7

पिस्ते, काजू, खजूर हे ड्रायफ्रूट न  भिजवता त्यांच्या मुळ रुपात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.   

3/7

अक्रोड आणि बदाम हे उष्ण असतात. त्यामुळे उन्हाळ्यात नुकसान होऊ शकते. पाण्यात भिजवल्याने त्याची उष्णता पाण्यात विरघळते आणि सर्वोत्तम फायदा मिळतो.   

4/7

अनेकजण मनुके न भिजवता तसेच खातात.  मात्र, मनुके भिजवून खाल्ले तर त्यात असलेले हानिकारक प्रिझर्वेटिव्ह निघून जातात आणि आरोग्याला त्रास होत नाही.  

5/7

बदाम भिजवलेले खावे असा सल्ला दिला जातो. कारण, बदामाच्या सालीमध्ये टॅनिन असते जे पोषक तत्वांचे शोषण रोखते. भिजवून खाल्ल्यास त्याची साल वेगळी होते आणि पूर्ण पोषण मिळते.   

6/7

मनुका, बदाम यांसारखे ड्रायफ्रूट्स भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. अशाच प्रकारे काही ड्रायफ्रूट्स भिजवून ठेवल्यास त्यांना अंकुर फुटू लागतात. त्यामुळे या गोष्टींचे पोषणमूल्य वाढते.  

7/7

भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने त्यातील फायटिक ऍसिडचे प्रमाण कमी होते आणि ते पचायला सोपे होते.