भारतातील 'या' सुंदरींनी पटकावला Miss World खिताब!

आज 9 मार्च रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड 2024 चा फिनाले होणार आहे. ज्याचे आयोजन भारतानं 27 वर्षांपूर्वी केले होते. ज्यात सिनी शेट्टी भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या आधी भारतातील कोणत्या महिलांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आणि मिस वर्ल्डचा खिताब मिळवला त्याविषयी जाणून घेऊया.  

| Mar 09, 2024, 18:37 PM IST
1/6

रीता फारिया

रीता फारिया या भारतातील पहिल्या महिला आहेत ज्यांनी 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत 1966 मध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व केले होते. इतकंच नाही तर त्यांना हा खिताबही मिळाला होता. त्यानंतर त्यांनी मॉडेलिंग सोडून MBBS चं शिक्षण पूर्ण केलं. रीता या 80 वर्षांच्या आहेत. 

2/6

ऐश्वर्या राय

1994 मध्ये ऐश्वर्या रायला हा खिताब मिळाला होता. ज्यानंतर तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि ती आज लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

3/6

डायना हेडन

1997 मध्ये व्हिक्टोरिया शहरात झालेल्या 'मिस वर्ल्ड' स्पर्धत भारतानं बाजी मारली होती. डायनानं हा खिताब तिच्या नावी केला. मात्र, अभिनय क्षेत्रात ती यशस्वी ठरली नाही. 2013 मध्ये तिनं कॉलिन डायना हेडनडिकशी लग्न केलं. ती आता सेलिब्रिटी गेस्ट लेक्चरर म्हणून काम करते. 

4/6

युक्ता मुखी

1999 मध्ये 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत युक्ता मुखीनं हा खिताब तिच्या नावी केला होता. युक्तानं सुरुवातीला मॉडेलिंग केली आणि अभिनय क्षेत्रात स्वत: चं नशिब आजमावलं. मात्र, तिला यश मिळालं नाही. तर 2008 मध्ये तिनं न्यूयॉर्कमध्ये असलेल्या बिजनेसमॅन प्रिंस तुलीशी लग्न केलं. पण 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तर ती 'गुड न्यूज' या चित्रपटात सगळ्यात शेवटी दिसली होती. 

5/6

प्रियांका चोप्रा

प्रियांका ही 2000 मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड या स्पर्धेची विजेती आहे. प्रियांकानं 18 वर्षांची असताना हा खिताब पटकावला होता. तिनं चित्रपटसृष्टीत स्वत: चं नशिब आजमावलं आणि आज ती ग्लोबल स्टार आहे. 

6/6

मानुषी छिल्लर

मानुषी छिल्लर ही 2017 मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत विजय ठरली होती. ती आता अभिनय क्षेत्रात सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिनं अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.