एका सामन्यात सर्वाधिक कॅच पकडण्याचा रकॉर्ड कोणाच्या नावावर? बसेल धक्का

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत अनेक विक्रम मोडले गेले आहेत. असाच एक विक्रम आयपीएल 2024 च्या 46 व्या सामन्यात झाला आहे. चेन्नई आणि हैदराबाद या दोघं संघात सामना खेळला गेला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने, तगड्या दिसत असलेल्या सनरायझर्स हैदराबादला 78 धावांनी पराभूत  केलंय. तर चेन्नईचा ऑलराउंडर खेळाडू डॅरेल मिचेलने या सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.    याने आपल्या नावावर केला आहे.

Apr 29, 2024, 20:08 PM IST
1/7

आयपीएल 2024 चा सिजन आतापर्यंत खूप अनोखा राहिलेला आहे. या सिजनच्या प्रत्येक सामन्यात जूने रेकॉर्ड तूटत आहेत, तर नवे रेकॉर्ड बनत आहेत. असाच एक रेकॉर्ड आयपीएल 2024 च्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा स्टार ऑलराउंडर डॅरेल मिचेल याने आपल्या नावावर केला आहे.

2/7

असाच एक अनोखा रेकॉर्ड आयपीएल 2024 च्या 46 व्या सामन्यात चेन्नईचा स्टार ऑलराउंडर डॅरेल मिचेल याच्या नावावर नोंदवला गेला आहे. या सामन्यात डॅरेल मिचेलने फलंदाजीत 52 धावांची उत्कृष्ट खेळी खेळत चेन्नईच्या विजयातसुद्धा महत्वाचं योगदान दिलं होतं. 

3/7

आयपीएल 2024 मधील चेन्नईविरूद्ध हैदराबाद सामन्यात चेन्नईचा ऑलराउंडर डॅरेल मिचेल याने तब्बल 5 कॅचेस पकडल्या आहेत. ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, शहबाज अहमद आणि पॅट कमिंस या 5 खेळाडूंच्या कॅच पकडत मिचेलने एका सामन्यात सर्वात जास्त कॅच पकडण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.   

4/7

मोहम्मद नबीने आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना, मुंबई इंडियन्सविरूद्ध तब्बल 5 उत्कृष्ट कॅचेस पकडल्या होत्या, तर आतापर्यंत नबी याने आयपीएलच्या करिअरमध्ये एकूण 31 कॅचेस पकडल्या आहेत. 

5/7

आयपीएल 2008 मध्ये मुंबई इंडियन्सचा महान खेळाडू सचिन तेंडूलकर याने केकेआरविरूद्धच्या सामन्यात एकूण 4 कॅचेस पकडल्या होत्या. आतापर्यंत सचिन तेंडूलकर याने आपल्या करिअरमध्ये 78 कॅचेस पकडल्या आहेत

6/7

आयपीएल 2010 मध्ये डेविड वॉर्नर हा दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Daredevils) खेळत असताना, राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात त्याने एकूण 4 कॅचेस पकडल्या होत्या. वॉर्नर हा अतिशय चपळ फिल्डर असून तो सर्वश्रेष्ठ फिल्डर्सपैकी एक आहे, या विशेष शैलीमुळे त्याने आपल्या करिअरमध्ये एकूण आतापर्यंत एकूण 86 कॅचेस पकडल्या आहेत.   

7/7

कोलकाता नाईट रायडर्सचा दिग्गज ऑलराउंडर जॅक कॅलिस हा जगातील सर्वोकृष्ठ ऑलराउंडर आहे, पण यासोबतच तो एक उत्कृष्ठ फिल्डरसुद्धा आहे. कॅलिसने आयपीएल 2011 मध्ये दिल्ली कॅपिट्सविरूद्ध (Delhi Daredevils) एकूण 4 कॅचेस पकडले होते.