PHOTO: 180 फ्लॉप, 47 डिजास्टर, तरीही बनला सुपरस्टार, संपत्ती 400 कोटींपेक्षा जास्त, कोण आहे अभिनेता?

Mithun Chakraborty Net Worth: आम्ही आज तुम्हाला अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याची लोकप्रियता आणि प्रचंड चाहता वर्ग आहे. ज्याने  करिअरमध्ये सर्वात जास्त फ्लॉप चित्रपट दिले आहेत. 

Soneshwar Patil | Jan 29, 2025, 17:51 PM IST
1/7

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाद्वारे इंडस्ट्रीवर राज्य केलं आहे. पण एक असा अभिनेता आहे ज्याने आपल्या करिअरमध्ये सर्वाधिक फ्लॉप चित्रपट दिले आहेत. 

2/7

या अभिनेत्याने आतापर्यंत 180 हून अधिक फ्लॉप चित्रपट दिले आहेत. त्यापैकी  47 डिजास्टर चित्रपट आहेत. तरी देखील हा अभिनेता सुपरस्टार आहे. 

3/7

1970 आणि 80 च्या दशकात अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी इंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यांनी सातत्याने अनेक चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. 

4/7

आजही सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी अभिनेत्याला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. 80-90 च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

5/7

त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. तरी देखील त्यांना आपले काम सुरुच ठेवले. त्यामुळे  ते निर्मात्यांची पहिली पसंत बनले. 

6/7

अभिनेत्याने 47 वर्षांच्या कारकिर्दीत 370 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यामधील 180 फ्लॉप ठरले. तरी देखील अभिनेत्याला सुपरस्टारचा दर्जा देण्यात आला आहे.

7/7

त्यांनी 50 हून अधिक हिट चित्रपट दिले आहेत. रिपोर्टनुसार, मिथुन चक्रवर्ती यांची संपत्ती 400 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यासोबतच त्यांच्याकडे लक्झरी कार देखील आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x