Mukesh Kumar Marriage : मुकेश कुमारचं शुभमंगल सावधान! 'क्लिन बोल्ड' करणारी दिव्या सिंह आहे तरी कोण?

Mukesh Kumar Got Married With Divya Singh : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मुकेश कुमार लग्नाच्या बेडीत अडकला आहे. 

| Nov 29, 2023, 17:55 PM IST

Mukesh Kumar Married : मुकेश कुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातून लग्नासाठी सुट्टी घेतली होती. बीसीसीआयकडे मुकेशने परवानगी मागितली होती.

1/7

दिव्या सिंह

मुकेश कुमारच्या पत्नीचं नाव दिव्या सिंह आहे. गोपालगंज येथील मुकेशचे लग्न गोरखपूरमध्ये झालं. अशातच आता लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत.

2/7

शेरवानी - लेहेंगा

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मुकेश कुमारने शेरवानी परिधान केली होती. तर दिव्या सिंह हिने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.

3/7

बनियापूर बेरूई

मुकेशची जीवनसाथी दिव्या सिंह छपराच्या बनियापूर बेरूई गावची रहिवासी आहे. मुकेश-दिव्याची एंगेजमेंट याच वर्षी फेब्रुवारीमध्ये झाली होती.

4/7

काकरकुंड

लग्नानंतर दोघंही 4 डिसेंबरला मुकेशच्या मूळ गावी काकरकुंडमध्ये रिसेप्शन देणार आहेत. त्यासाठीची तयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे.

5/7

व्हिडीओ

मुकेशच्या लग्नात काही खास लोकांनीच हजेरी लावली होती. त्याच्या लहानपणीचे मित्र आणि कुटुंबातील लोकांनी लग्नात डान्स केल्याचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

6/7

मुकेश कुमार

मुकेशने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे. 2023 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. 

7/7

आंतरराष्ट्रीय सामने

आतापर्यंत त्याने 1 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 2, एकदिवसीय सामन्यात 4 आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत.