PHOTO : हार्दिक पांड्यासोबत डेटिंगची चर्चा, इंस्टावर बोल्ड फोटोंचा भडीमार! कोण आहे जॅस्मिन वालिया?

Who Is Jasmin Walia : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोटानंतर अनेक चर्चांना उधाण येत आहे. हार्दिकचं अनन्य पांडेसोबत नाव जोडल्या जात होतं. तर आता जॅस्मिन वालियाला हार्दिक डेट करत आहे, अशा बातम्यांना समोर आल्या आहेत. 

| Aug 14, 2024, 12:37 PM IST
1/10

नताशासोबत घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पांड्याचे नाव कधी अभिनेत्री अनन्यासोबत जोडलं गेलं. तर आता हार्दिक जॅस्मिन वालियासोबत ग्रीसला सुट्टीसाठी गेला होता, असं समोर आलंय. 

2/10

जॅस्मिन वालिया ही कोण आहे, असा शोध चाहते गुगलवर लावत आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, जॅस्मिन ही एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही स्टार आहे. 

3/10

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जॅस्मिनचे आई-वडील हे भारतीय वंशाचे असून तिचा जन्म हा लंडनमधील एसेक्समध्ये झालाय. 

4/10

जॅस्मिन सोशल मीडियावरही खूप सक्रीय असून तिचे असंख्य हॉट आणि बोल्ड फोटो, व्हिडीओला तुफान लाइक मिळतात.  

5/10

द ओनली वे इज एसेक्स या ब्रिटीश रियॅलिटी टीव्ही शोमधून जॅस्मिन खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाली. 2010 मध्ये तिने एक्स्ट्री मधून सुरुवात केल्यानंतर 2012 या शोची मुख्य कलाकार बनली. 

6/10

या शोनंतर जॅस्मिन टीव्ही जगत सोडून म्युझिक इंडस्ट्रीकडे वळली. तिने 2014 मध्ये यूट्यूब चॅनेल सुरु केलं. या चॅनेलवर ती इतरांची गाणी गाऊन प्रसिद्ध झाली. 

7/10

त्यानंतर ती जॅक नाइट, इंटेन्स-टी आणि ग्रीन म्युझिकशी जोडल्या गेली. त्यानंतर तिला 2017 मध्ये बोड डिजी यातून सर्वात मोठा ब्रेक मिळाला.

8/10

जॅस्मिनने पहिल्यांदाच जॅक नाईटसोबत परफॉर्म केलं आणि 2018 मध्ये 'सोनू के टीटू की स्वीटी' या बॉलिवूड चित्रपटासाठी 'बम डिगी डिगी बम' या गाण्याचा रिमेक करण्यात आला, तेव्हा तिची लोकप्रियता अधिकच वाढली. 

9/10

त्यानंतर 2022 मधील बिग बॉस 13 च्या फायनलिस्ट असीम रियाजसोबत स्मिन वालियाने नाईट्स एन फाइट्स नावाचा म्युझिक व्हिडीओ करुन प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हा व्हिडीओ आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप गाजला होता. एवढंच नाही तर टाईम्स स्क्वेअरच्या होर्डिंगवरही तो झळकला होता. 

10/10

जॅस्मिन सोशल मीडिया सेन्सेशन असून इन्स्टाग्रामवर तिचे 6.4 लाख फॉलोअर्स आहेत. तर युट्यूबचं बोलायचं झालं तर जॅस्मिनला 5.7 लाख सबस्क्राईब आहेत. ती अनेकदा तिचे बोल्ड आणि सनसनाटी फोटो पोस्ट करत असते.